पुणेकरांसाठी Good News, नवीन मार्ग झाला सुरु, वाहतूक कोंडी टळणार
पुणे शहारतील चांदणी चौकातील मुख्य बोगदा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. यामुळे चांदणी चौकातून मुळशीकडे या भुयारी मार्गाने जात येणार आहे. पुणेकरांची या ठिकाणी वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. आता पूल कधी सुरु होणार? याची प्रतिक्षा पुणेकरांना आहे.
अभिजित पोते, पुणे : पुणे शहारातील चांदणी चौक (Chandani chowk) पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु आहे. हा नवीन पूल येत्या काही दिवसांत खुला होणार आहे. या पुलामुळे चांदणी चौकातून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणेकरांना आणखी एक चांगली सुविधा या पुलाच्या माध्यमातून मिळणार आहे. चांदणी चौकातील पहिला भुयारी मार्ग अखेर वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. तसेच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
कोकणात जाता येणार
चांदणी चौकातील मुख्य बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे चांदणी चौकातून मुळशीकडे जाणारा भुयारी मार्गाने जाताना वेळ वाचणार आहे. या मार्गातून मुळशी पौड मार्गे पुढे कोकणात देखील जाता येणार आहे. यामुळे मुळशीकडे जाणारी वाहतूक कोंडी आता थांबणार आहे.
भुयारी मार्गात रेखाचित्र
भुयारी मार्गात अनेक रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे. संपूर्ण मुळशी तालुक्याचे वैशिष्ट्य सांगणारे वैशिष्ट्यपूर्ण रेखाचित्र या भुयारी मार्गात रेखाटण्यात आले आहेत. मुळशी तालुक्यातील सर्व वैशिष्ट्ये पेंटिंगच्या रूपात या भुयारी मार्गातून दाखवण्यात आले आहेत.
ही आहेत वैशिष्ट्ये
चांदणी चौकातील भुयारी मार्गातील चित्रांची काय आहेत खास वैशिष्ट्ये पाहूया
- मुळशी तालुक्यातील भक्ती शक्तीचा संगम चित्रातून दाखवला आहे
- मुळशी तालुक्यात होणारी भात शेती, पर्यटन स्थळे आणि देवदर्शन स्थळे दाखवली आहेत.
- मुळशी तालुक्यातील जगप्रसिद्ध कुस्तीचे रेखाचित्र या भुयारी मार्गात रेखाटण्यात आले आहेत
२ ऑक्टोंबर रोजी पाडला होता पूल
चांदणी चौकातील पूल २ ऑक्टोंबर रोजी पाडला होता. अगदी सहा सेंकदात हा पूल पाडण्यात आला होता. पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात होते. मग 600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग वापर केला गेला होता. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोगाने ब्लास्ट करण्यात आला. २ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान पूल पाडण्यात आला. त्यानंतर वाहतूक कोंडीच्या समस्यांना पुणेकरांना सामोरे जावे लागत होते. परंतु आता ही कोंडी पूल सुरु झाल्यावर होणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे भुयारी मार्ग सुरु झाला आहे.
हे ही वाचा
पुण्याची महिला मोटारसायकलवर साडी परिधान करुन निघाली वर्ल्ड टूरला, एक लाख किमी प्रवास करणार