Pune Metro : व्हायरल व्हिडिओनंतर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय, आता यासाठी असणार बंदी

Pune Metro : पुणे मेट्रो सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पुणे मेट्रोचे दोन मार्ग सुरु होऊन आता महिनाभर झाला आहे. या मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. नुकताच पुणे मेट्रोतील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यासंदर्भात मेट्रोने निर्णय घेतला आहे.

Pune Metro : व्हायरल व्हिडिओनंतर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय, आता यासाठी असणार बंदी
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 10:34 AM

पुणे | 4 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात दोन नवीन मार्गावर मेट्रो सुरु झाली. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल या मार्गांवर मेट्रो धावत आहे. त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ऑगस्ट महिन्यात मेट्रोतून रोज सरासरी 65 हजार 822 जणांनी प्रवास केल्याची आकडेवारी जाहीर झाली. यामुळे मेट्रोला 3 कोटी 7 लाख 66 हजार 481 रुपयांचे उत्पन्न मिळाले. मेट्रो प्रवासाला पुणेकर प्राधान्य देत असताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मेट्रोतील सायकल प्रवासाचा हा व्हिडिओ होता.

पुणे मेट्रोने काय घेतला निर्णय

व्हायरल व्हिडिओनंतर पुणे मेट्रोने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन नवीन सूचना जारी केल्या आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये युवक मेट्रो स्टेशनवर सायकल चालवत जात होता. त्यानंतर ती सायकल मेट्रोमध्ये घेऊन गेला. त्यासंदर्भात महामेट्रोने म्हटले आहे की, मेट्रो स्थानकांच्या आत आणि मेट्रोमध्ये सायकली नेण्याची परवानगी आहे, परंतु सायकल चालवण्यास परवानगी नाही. यामुळे यापुढे कोणीही मेट्रो स्थानकाच्या आतामध्ये सायकल चालवून नये. मेट्रो स्थानकाच्या बाहेरपर्यंतच सायकल चालवता येईल.

काय होते व्हायरल व्हिडिओमध्ये

व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका तरुण मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्यांची सायकल होती. तो सायकलवर बसून मेट्रो स्थानकात आला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याची तपासणी केली. मेट्रोच्या लिफ्टमध्ये तो सायकल घेऊन गेला. त्यानंतर मेट्रोमध्ये सायकलसोबत तो चढला. या व्हिडिओनंतर महामेट्रोने स्थानकावर कोणीही सायकल चालवू नये, असे आदेश काढले आहे.

हे सुद्धा वाचा

महामेट्रोने काय म्हटले

महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, मेट्रोमधून सायकल घेऊन जाताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच मेट्रो प्लॅटफॉर्मवर सायकल चालवण्यास सक्त मनाई आहे, हे लक्षात घ्यावे. मेट्रो स्थानकावर सायकल चालवल्यामुळे एखादा अपघात होऊ शकतो.

मेट्रो स्थानकावर सायकल चालवण्यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक कॉमेंट आल्या. पुणे तेथे काय उणे…यासारख्या कॉमेंट पडल्या आहेत.

हे ही वाचा

Pune Metro Video : पुणे मेट्रोतून सायकल प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल, कॉमेंटचा पाऊस

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.