पुणे शहरात पोलिसांचा धाक उरला नाही का? टोळक्यांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

Pune Crime News : पुणे शहरात दहशतवादी टोळ्यांकडून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला जात आहे. काही दिवसांपूर्वी सहकारी नगरमध्ये तलवारीने केक कापण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर सोमवारी रात्री गुन्हेगारी टोळक्यांनी दहशत निर्माण केली.

पुणे शहरात पोलिसांचा धाक उरला नाही का? टोळक्यांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 10:44 AM

अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेले पुणे. शहरातील वातावरण बदलू लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. कोयता गँगचा धुमाकूळ अधूनमधून सुरु असतो. पुणे शहरातील गुन्हेगारी थांबण्यात नसल्यामुळे विरोधकांनी सरकारला जाब विचारला आहे. यासंदर्भात बॅनरबाजी केली गेली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसकडून तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती. आता पुणे शहरात दहशत निर्माण करण्याचा आणखी एक प्रकार सोमवारी रात्री घडला आहे.

काय केले गुन्हेगारी टोळक्यांनी

पुणे शहरात गुन्हेगारी टोळक्याची पुन्हा धुडगूस घातली आहे. या टोळक्यांनी वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर घरावरही दगडफेक केली आहे. सहकार नगर पोलीस ठाण्याच्या अरण्येश्वर भागात मध्यरात्री टोळक्याकडून 10 ते 15 वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर घरावरही दगडफेक करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आठ दिवसांपूर्वी सहकार नगरच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड झाली होती. आता पुन्हा दहशत माजवण्यासाठी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. आठ दिवसानंतर सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच ही तोडफोड झाली आहे. यामुळे या प्रकरणातील गुन्हेगार तेच असण्याची शक्यता आहे. आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

तलवारीने केक कापला

सहकार नगर परिसरात गुन्हेगारी टोळ्या वाढल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड केल्यानंतर नागरिक संतप्त झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी सहकारनगरमधील भर चौकात गाडी आडवी लावत तलवारीने केक कापत “भाईचा” वाढदिवस साजरा झाला. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. हा व्हिडिओ चांगलाचा व्हायरल झाला होता. त्यामुळे या गुन्हेगारी टोळ्या पोलिसांसमोर आव्हान बनल्या आहेत. पुणेकरांसाठी पोलीस या टोळींचा कसा निपटारा करणार? हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. नागरिकांनी या टोळ्यांचा ठोस बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....