पुणे शहरात पुन्हा बॅनरबाजी, आता भावी खासदार म्हणून कोणाचा आला उल्लेख

नेहमी शहरात जोरदार बॅनरबाजी अधूनमधून होत असते. ही बॅनरबाजी विधानसभा पोटनिवडणुकीत चांगलीच गाजली होती. राज्यभर त्याची चर्चा सुरु झाली होती. आता लोकसभा निवडणूक जाहीर झाली नसताना बॅनरबाजी सुरु झाली आहे. आता राष्ट्रवादीकडून बॅनर लावले गेले आहे.

पुणे शहरात पुन्हा बॅनरबाजी, आता भावी खासदार म्हणून कोणाचा आला उल्लेख
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 12:01 PM

पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. गिरीश बापट हे पुण्याचे खासदार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीत यासाठी स्पर्धा लागली आहे. आता पुणे शहरात पुन्हा भावी खासदार म्हणून बॅनरबाजी सुरू झाली आहे. त्यावर या नेत्याचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.

कोणाचे लागले बॅनर

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून शहरात बॅनर झळकले आहेत. पुण्यातील वडगाव भागात हे बॅनर लावण्यात आले आहेत. याआधीही प्रशांत जगताप यांचे भावी खासदाराचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, मात्र आता प्रत्यक्षात बॅनर लावण्यात आले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात अद्याप पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. त्यातच या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. काँग्रेस नेत्यांकडून ही जागा आम्हीच लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच प्रशांत जगताप यांना भावी खासदार केले गेले आहे. त्याची चर्चा या बॅनरमुळे होताना दिसतेय.

भाजपकडूनही झाली होती बॅनरबाजी

पुणे शहरात जोरदार बॅनर होत असते. ही बॅनरबाजी विधानसभा पोटनिवडणुकीत चांगलीच गाजली. यापूर्वी भाजपचे नेते जगदीश मुळीक यांच्या नावाचे पोस्टर भावी खासदार म्हणून लावण्यात आले होते. जगदीश मुळीक हे भाजपचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. माजी आमदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुळीक यांच्या नावाचे मोठमोठे बॅनर लावले आहेत. त्यावर भावी खासदार जगदीश मुळीक असं लिहिलं आहे. भावी खासदार जगदीश मुळीक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं या बॅनर

लिहिलं आहे.त्यानंतर प्रशांत जगताप यांच्या नावाचा भावी खासदार म्हणून उल्लेख असलेले पोस्टर समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.

काँग्रेस पुणे लढवणार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. बापट यांना जाऊन तीन दिवस झाले. राज्याच्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एवढी घाई काय आहे? जरा शांत राहा. निवडणुका होतच राहतील की. बापट जाऊन आज तीन दिवस होतायत, माणुसकी हा प्रकार आहे का नाही? असा सवाल अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी केला होता. आता त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते भावी खासदार होताय.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....