Pune-Crime News : दीड वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले, संसार सुखात चालला होता अन् पडला मिठाचा खडा
Pune-Crime News : पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचा संसास सुखाने सुरु होता. परंतु अचानक त्यांच्या संसारात विघ्न आले. त्यामुळे दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले...
पुणे | 11 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील त्या दोघांचे लग्न दीड वर्षांपूर्वी झाले होता. त्यांना सात महिन्यांची मुलगीही होती. अचानक त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. त्यामुळे दोघ पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला. या वादानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलले. त्यानंतर त्यांच्या संसाराचा डाव अर्ध्यावर मोडला. पुणे शहरातील येरवडा परिसरात राहणाऱ्या जोडप्यासंदर्भात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
काय घडले की त्याने उचलले टोकाचे पाऊल
पुणे शहरातील येरवडा भागात राहणाऱ्या रुपाली भोसले आणि आशिष भोसले यांचे लग्न दीड वर्षांपूर्वी झाले. त्यांचा नवीन संसार सुखाने सुरु होता. त्यांच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाले. त्यांची मुलगी ७ महिन्यांची झाली होती. परंतु आशिषला रुपालीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. मागील काही दिवसांपासून रुपालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आशिषला आला. त्यातून त्याने अनेक वेळा तिच्याशी भांडणे केले.
अन् त्या दिवशी असे केले…
आशिष आणि रुपाली यांच्यात शनिवारी रात्री जोरदार भांडणे झाले. आशिषने रुपालीला शिवीगाळ केली. त्यानंतर संतापलेल्या आशिषने धारदार चाकूने रुपालीच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाले. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेतांना तिचा मृत्यू झाला. आशिष हॉटेलमध्ये काम करत होता. या प्रकरणी पुणे विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पोलीस अधिकारी घटनास्थळी
घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त संजय पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. दरम्यान आरोपी आशिष जाधव याला पोलिसांनी अटक केली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय धामणे यांनी सांगितले.