अभिजित पोते, पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी पोलिसांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. सांस्कृतिक शहर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारीबरोबर अंमली पदार्थांची विक्री होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. कारण कधी कोयता गँगचा धुमाकूळ असतो तर कधी गुन्हेगारी टोळ्या वाहनांची तोडफोड करत आहेत. या सर्व प्रकारानंतर पुणे शहरात अंमली पदार्थांचा विक्री वाढत आहे. मागील सहा महिन्यांत सात कोटींपेक्षा जास्त किंमतीचे ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केले आहे.
पुणे शहरात तस्कर अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी चक्क इमोजी कोडचा वापर करत आहेत. अंमली पदार्थांना विशिष्ट इमोजीचे कोडवर्ड तस्कारांनी दिले आहेत. पुणे पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात ट्विट करत पोलिसांनी माहिती दिली आहे.
पुणे शहर पोलिसांनी मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहे. गेल्या सहा महिन्यांत 82 डिलरकडून तब्बल 7.28 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहे. या प्रकरणी आरोपींनाही पोलिसांनी अटक केली. पुणे शहर अंमली पदार्थांचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी आता चक्क इमोजी कोडवर्डचा वापर होत आहे. ड्रग्स विकत देणारे अन् घेणारे पोलिसांच्या चकवण्यासाठी कोडवर्ड वापर आहे. इमोजीच्या कोडवर्डमधून ते संवाद साधत व्यवहार पूर्ण करत आहे.
Ganja ???
Cocaine ???❄️
MDMA ??
Mushrooms ?
Meth ?⚗️
Xanax ?
Heroin ????????: Emojis ? widely used in CHATS by Drug Dealers & Users to refer to various drugs
82 Drug Dealers arrested & Rs. 7.28 cr worth drugs seized in last 6 months.#SayYesToLife #NoToDrugs
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) June 24, 2023
गांजा ??
कोकेन ??
MDMA ?
मशरूम ?
हेरॉईन ?
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले की, पालकांना अन् मुलांना सतर्क राहण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. तस्कर इमोजीचा वापर करुन अंमली पदार्थांची विक्री करत आहे. पोलिसांच्या रडारवर ते आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे. परंतु पालक अन् मुलांनीही सावध राहवे.