पुणे शहरात मोर्चाबांधणीसाठी अजित पवार गटाची रणनीती, शरद पवार यांना रोखण्यासाठी अशी असेल व्यूहरचना

| Updated on: Aug 18, 2023 | 8:42 AM

Pune News : पुणे शहरात वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार गटाचे प्रयत्न सुरु आहेत. शरद पवार राज्यात अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. आता अजित पवार यांनी पुणे शहराकडे लक्ष दिले आहे. त्यासाठी रणनिती तयार केलीय.

पुणे शहरात मोर्चाबांधणीसाठी अजित पवार गटाची रणनीती, शरद पवार यांना रोखण्यासाठी अशी असेल व्यूहरचना
Follow us on

पुणे | 18 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी भूकंप झाला होता. शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेत अजित पवार यांनी नवीन वाट धरली. अजित पवार शिवसेना-भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत नऊ जण मंत्री झाले. आता अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत? हा आकडा आलेला नसला तरी ४० आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला जात आहे. अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गट पुण्यासह राज्यात आपले संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

शरद पवार यांचे दौरे

राष्ट्रवादी पक्षातील बंडानंतर शरद पवार यांनी राज्यात दौरे सुरु केले आहे. शरद पवार यांच्याकडून विविध जिल्ह्यांमध्ये दौरे सुरु केले असून सभा घेत आहेत. गुरुवारी बीडमध्ये त्यांनी सभा घेत बंडखोरांना आव्हान दिले. माझा वयाचा मुद्दा काढू नका, तुम्ही माझे काय पाहिले आहे? असा सवाल त्यांनी केला. या सभेला गर्दीही चांगली होती.

अजित पवार यांची तयारी

अजित पवार यांनी पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. पुणे शहरात अजित पवार गटाने पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. या माध्यमातून आपल्या गटाचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कार्यक्रम शनिवारी होत आहे. यावेळी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील आणि रुपाली चाकणकर उपस्थित राहणार आहे. यावेळी शहर कार्यकारणी नियुक्त केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

जबाबदाऱ्यांचे होणार वाटप

पुणे शहर आणि जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजित पवार गटाने रणनिती तयार केली आहे. या रणनितीचा एक भाग म्हणून शनिवारी पक्षातील कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहे. शरद पवार यांच्या गटापेक्षा आपला गट मजबूत करण्यासाठी आतापासूनच पक्ष बांधणी अजित पवार करणार आहे. पुणे हे दोन्ही नेत्यांचा होमटाऊन आहे. यामुळे या ठिकाणी आपले वर्चस्व असावे, असा प्रयत्न अजित पवार आणि शरद पवार दोन्ही करणार आहे.