पुणे | 30 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात चांगले वातावरण असल्यामुळे अनेक जण पुण्यात आपले घर घेतात. रोजगार आणि शिक्षणाच्या अनेक संधी पुण्यात उपलब्ध आहेत. यामुळे पुणे शहरातील रियल इस्टेटचा व्यवसाय देशात नेहमीच तेजीत असतो. पुणे शहर आणि उपनगरमध्ये अनेक बिल्डरांनी आपले प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पांमध्ये बुकींग चांगले होत असते. आता पुणे शहरातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात दीड ते दोन कोटींचा फ्लॅट घेण्यासाठी पुणेकरांनी रांग लावल्याचे म्हटले आहे. आठ तास रांगेत लोक फ्लॅटच्या बुकींगसाठी उभे असल्याचे या व्हायरल व्हिडिओत म्हटले आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
राज्यातील रिअल इस्टेटमध्ये 37.4% वाढ झाली आहे. त्यात पुणे आणि मुंबईचा वाटा सर्वाधिक आहे. अफोर्डेबल हाउसिंग अपार्टमेंटच्या तुलनेत लग्जरी अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेण्याचा कल वाढत आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. IndianTechGuide कडून सोशल मीडिया एक्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातील रांग पाहून तुम्हाला असे वाटेल की, एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी ही गर्दी केली आहे. परंतु हा व्हिडिओ पुणे शहरातील वाकड परिसरातील दिसत आहे. या भागांत 1.5 ते 2 कोटींचा फ्लॅट घेण्यासाठी लोक रांगेत उभे असल्याचा दावा केला आहे.
People stand in a queue for 8 hours to buy a new 1.5-2 crore apartment in Pune. (📸- @Ayeits_Ekant) pic.twitter.com/iYyEkZ1wwr
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) October 27, 2023
IndianTechGuide कडून शेअर केलेला हा व्हिडिओ १५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. अनेक वेळा तो शेअर झाला आहे. अनेकांनी त्यात कॉमेंट केल्या आहेत. दहा हजारांपेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. काही जणांनी लोकांकडे किती पैसा आहे तर काहींनी या दोन कोटी रुपये किंमत आहे, असे या अपार्टमेंटमध्ये काय आहे? असे म्हटले आहे. पुणेकर श्रीमंत असल्याचे काही युजरने म्हटले आहे. या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.