फक्त थोडी रक्कम द्या अन् घर घ्या, पुणे शहरात फक्त ज्येष्ठांसाठी प्रकल्प, ज्येष्ठांसाठीच्या सर्व ॲनिमिटीज

Pune News : ज्येष्ठ नागरिकांसाठी आगळा वेगळा प्रकल्प आता सुरु होणार आहे. पुणे शहरात हा प्रकल्प सुरु होणार आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना हवे तितके दिवस राहता येणार आहे. त्यासाठी एक कंपनीकडून २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

फक्त थोडी रक्कम द्या अन् घर घ्या, पुणे शहरात फक्त ज्येष्ठांसाठी प्रकल्प, ज्येष्ठांसाठीच्या सर्व ॲनिमिटीज
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 4:27 PM

पुणे : वृद्धांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दोन वर्षांत देशभरात ज्येष्ठ जीवन प्रकल्प उभारण्याची योजना एका अमेरिकन कंपनीने आखली आहे. याअंतर्गत 2 हजार घरे बांधण्यात येणार आहेत. हे प्रकल्प पुणे, दिल्लीसह नऊ शहरांमध्ये बांधले जातील. अमेरिकेची कोलंबिया पॅसिफिक कम्युनिटीज (CPC) या कंपनीकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी घरे बनवण्यात येणार आहे. या प्रकल्पांसाठी सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनी करणार आहे. सीपीसीचे सीईओ मोहित नरुला यांनी ही माहिती दिली. दरवर्षी 800-1000 घरे ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधायची असल्याचे मोहित नरुला यांनी सांगितले.

ज्येष्ठांसारख्या सुविधा

खास ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधलेल्या निवासी अपार्टमेंटमध्ये सुविधा सर्व ज्येष्ठांना लक्षात घेऊन करण्यात येणार आहे. या अपार्टमेंटमध्ये व्हीलचेअर, फ्रेंडली दरवाजे, अँटी-स्किड फ्लोअरिंगचा समावेश असणार आहे. सीपीसीने बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोईम्बतूर सारख्या शहरांमध्ये अशी घरे बांधली आहेत. या वर्षाच्या अखेरीस पुण्यात काम सुरू करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ नागरिक मदतीशिवाय जगणार

सीपीसीचे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मॉडेल आहे. यामध्ये वृद्ध व्यक्ती इतरांच्या मदतीशिवाय जगू शकतात. त्यांना त्यांची आवश्यक दैनंदिन कामे करण्यासाठी आधाराची गरज नसणार. घरकाम, बागकाम यासारखी कामे करण्यासाठी सर्विस प्रोवाइडर्स असतील.

या शहरांमध्ये काम सुरु

हैदराबाद आणि कोलकातामध्ये 2023-24 मध्ये हे काम सुरू होणार आहे. यासाठी कंपनी नवीन मॉडेलचा विचार करत आहे. त्याचे नाव असिस्टेड लिव्हिंग कम्युनिटीज आहे. या मॉडेलमध्ये वयोवृद्ध व्यक्ती भाड्याने ज्येष्ठ निवासस्थान घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना पैसे जमा करावे लागतील. हे निवासी अपार्टमेंट भाड्याने घेण्यासारखे आहे.

ठेव रक्कमवर मिळेल घर

पुढील वर्षी बेंगळुरूमध्ये पहिला प्रकल्प सुरू होणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प चेन्नईत सुरू होईल. या अपार्टमेंटसाठी ठेव रक्कम, सुमारे 25,000 ते 30,000 रुपये असेल. एखादी ज्येष्ठ व्यक्ती घरातून बाहेर पडल्यावर मालमत्ता विकासकाला परत केली जाईल. मालमत्ता विकासकाला परत दिल्यावर ज्येष्ठ व्यक्तीला त्याची रक्कम परत केली जाईल. हा मॉडेल देशभरातील ज्येष्ठांना खूप फायदेशीर ठरणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.