पुणेकरांनो दुचाकी वापरताना पार्किंग शुल्क भरण्याची तयारी ठेवा, आता ही महत्वाची रस्ते होणार ‘पे अँण्ड पार्क’
Pune News: पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा बळकट नाही. त्यातच पुणे मनपाने रस्त्यांवर 'पे अँण्ड पार्क' केले जात आहे. त्याचा फटका पुणेकरांना बसणार आहे. पुणे मनपाच्या या निर्णयास पुणेकरांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. पुणे मनपावर प्रशासक राज आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात सर्वच राजकीय पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात राज्यात नव्हे तर देशात सर्वाधिक वाहने आहेत. यामुळे पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी नेहमीची झालेली असते. पुण्यात मुंबईसारखी सर्वत्र लोकल अन् मेट्रो सेवा नाही. यामुळे पुणेकरांची भिस्त आपली वाहने आणि पीएमपीएमएलच्या बसेसवर असते. परंतु पीएमपीएमएलच्या बसेसमधून प्रवास जिकारीचा विषय असतो. त्यामुळे पुणेकरांना सर्वात चांगला पर्याय आपली दुचाकी किंवा चारचाकी वाहने वाटतात. परंतु आता पुणेकरांना मुख्य रस्त्यांवर वाहन पार्किंग करताना शुल्क भरावे लागणार आहे. त्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहेत.
हे रस्ते होणार ‘पे अँण्ड पार्क’
पुणे शहरातील पाच प्रमुख रस्त्यावर पार्किंग शुल्क आकारण्याची तयारी पुणे महानपालिकेने केली आहे. यामध्ये जंगली महाराज रोड, बालेवाडी हायस्ट्रीट रोड, विमाननगर रस्ता, फर्ग्यूसन रोड, नॉर्थ मेन रोड या पाच रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवर दुचाकी किंवा चार चाकी वाहने लावल्यावर पार्किंग शुल्क लागणार आहे. या संदर्भात पुणे महापालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. राज्य शासनाने ही रस्ते ‘पे अँण्ड पार्क’ करण्याची परवानगी दिल्यास त्या रस्त्यांवर वाहने लावल्यावर पैसे मोजावे लागणार आहे.
किती लागणार शुल्क
पुणे शहरातील सर्वाधिक गजबजलेले रस्ते आता ‘पे अँण्ड पार्क’ होण्याचा मार्गावर आहे. या ठिकाणी दुचाकीसाठी प्रतितास 10 ते 20 रुपये शुल्क लावण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव पुणे मनपाने पाठवला आहे. तसेच चारचाकी वाहनांसाठी प्रतितास 50 ते 100 रुपये पार्किंग शुल्क असणार आहे. यामुळे पुणेकरांना आता पैसे मोजूनच वाहने पार्क करावी लागणार आहे.
विरोध होण्याची शक्यता
पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक सेवा बळकट नाही. त्यातच पुणे मनपाने रस्त्यांवर ‘पे अँण्ड पार्क’ केले जात आहे. त्याचा फटका पुणेकरांना बसणार आहे. पुणे मनपाच्या या निर्णयास पुणेकरांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. पुणे मनपावर प्रशासक राज आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात सर्वच राजकीय पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.