Ganesh Utsav 2023 | काश्मिरात प्रथमच बसणार गणपती, परंतु संदर्भ पुणे शहराचा

Pune Ganesh Utsav 2023 | गणेश उत्सव सुरु होण्यास आता चार दिवस राहिले आहे. सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. सार्वजनिक गणेश मंडळे अंतिम टप्याच्या कामाला लागले आहे. त्याचवेळी यंदा प्रथमच काश्मीरमध्ये 'गणपती बाप्पा मोरया...' चा आवाज घुमणार आहे.

Ganesh Utsav 2023 | काश्मिरात प्रथमच बसणार गणपती, परंतु संदर्भ पुणे शहराचा
pune ganesh utsavImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 9:53 AM

पुणे | 15 सप्टेंबर 2023 : राज्यात १९ सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत आहे. घराघरात आणि सार्वजनिक गणेश मंडळात गणरायाचे आगमन होणार आहे. त्यासाठी सर्वत्र तयारी सुरु आहे. भाविकांनी आपल्या घरी गणरायाची मूर्ती आणण्यासाठी बुकींग केले आहे. गणेशोत्सवाचा सर्वाधिक उत्साह देशात महाराष्ट्रात होतो. त्यातच पुणे आणि मुंबईतील गणेश उत्सव पाहण्यासाठी परदेशातील भाविक येतात. आता यंदा प्रथमच काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी पुणे शहराचा संदर्भ आहे.

काय आहे पुणे ते काश्मीर

पुणे शहरातील गणेशोत्सव सातासमुद्रापार पोहोचला आहे. परंतु अजूनपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये कधी सार्वजनिक गणेशोत्सव झालेला नव्हता. आता यंदा प्रथमच दीड दिवसांचा गणपती श्रीनगरमध्ये बसणार आहे. अगदी लाल चौकापासून पाचशे मीटर अंतरावर हा गणेशोत्सव होणार आहे. श्रीनगरमध्ये श्रीच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करुन दीड दिवसानंतर त्याचे विसर्जन केले जाणार आहे. यासाठी पुणे शहरातील सात गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे.

कोणत्या मंडळांचा आहे पुढाकार

पुणे शहरातील सात गणेश मंडळानी घेतलेल्या पुढाकारामुळे यंदा काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे. पुणे येथील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती, केसरी वाडा हे मानाचे पाच गणपती तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडई मंडळ या सात मंडळांनी यासाठी प्रयत्न केले. श्रीनगर येथील गणपती उत्सवासाठी पुण्यातील कसबा गणपतीची प्रतिकृती तयार करण्यात आली. ही मूर्ती संदीप कौल आणि शिशांत चाको यांच्याकडे सुपूर्द केली.

हे सुद्धा वाचा

काश्मीरमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह

यंदा काश्मीरमध्ये गणेश उत्सावाचा उत्साह दिसत आहे. यामुळे काश्मीरात प्रथमच सार्वजिनक ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्याय येत आहे. यासाठी पुणे शहरातील गणेश मंडळांनी मदत केली आहे. यामुळे गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष प्रथमच काश्मीरमध्येही गुंजणार आहे. पुणे शहरात गणेश मंडळांनी गणरायाच्या स्वागताची तयारी जोरदार सुरु केली आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे देखावे पूर्ण करण्यावर भर देत आहे.

'चहा-पोहे तयार होते, आपटे खायला येणार होता अन्...', कोणी केला हल्लाबोल
'चहा-पोहे तयार होते, आपटे खायला येणार होता अन्...', कोणी केला हल्लाबोल.
शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, आव्हाडांवर गुन्हा दाखल करा... भाजपची मागणी
शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, आव्हाडांवर गुन्हा दाखल करा... भाजपची मागणी.
ठाकरे गटाच्या मुंबईतील संभाव्य 22 उमेदवारांची नावं TV9 मराठीच्या हाती
ठाकरे गटाच्या मुंबईतील संभाव्य 22 उमेदवारांची नावं TV9 मराठीच्या हाती.
मोदींच्या माफीमागे 'ही' 3 कारणं, माफीनाम्यावर राहुल गांधींचा हल्लाबोल
मोदींच्या माफीमागे 'ही' 3 कारणं, माफीनाम्यावर राहुल गांधींचा हल्लाबोल.
'दीड वर्ष झाले तरी मोदी मणिपूरला गेले नाही, ते जाऊच शकत नाही कारण...'
'दीड वर्ष झाले तरी मोदी मणिपूरला गेले नाही, ते जाऊच शकत नाही कारण...'.
'कोण थुंकलं तर वाहून जाईल, जलील चिरकूट माणूस', भाजप नेत्याचा हल्लाबोल
'कोण थुंकलं तर वाहून जाईल, जलील चिरकूट माणूस', भाजप नेत्याचा हल्लाबोल.
बाप्पाला काय नैवेद्य द्यावा,तुम्हाला प्रश्न पडलाय? इथे मिळेल छप्पन भोग
बाप्पाला काय नैवेद्य द्यावा,तुम्हाला प्रश्न पडलाय? इथे मिळेल छप्पन भोग.
दादांच्या NCPत नवा संघर्ष, 'रुपाली vs रुपाली वाद, नाराजीचं कारण काय?
दादांच्या NCPत नवा संघर्ष, 'रुपाली vs रुपाली वाद, नाराजीचं कारण काय?.
गणेशोत्सवावर पावसाचं सावट; जाणून घ्या,पुढील काही दिवसांचे अपडेट
गणेशोत्सवावर पावसाचं सावट; जाणून घ्या,पुढील काही दिवसांचे अपडेट.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा, शिंदे म्हणाले, आता लालपरीतून...
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा, शिंदे म्हणाले, आता लालपरीतून....