Ganesh Utsav 2023 | पुणे शहरात घरोघरी विराजमान होणार नावीन्यपूर्ण गणपती… नवीन उपक्रम अन् नवे अभियान

Pune Ganesh Utsav 2023 | गणेश उत्सव सुरु होण्यास तीन दिवस राहिले आहे. सर्वत्र गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. पुणे शहरात यंदा गणेशोत्सवासाठी नवीन पद्धतीने गणरायच्या मूर्त्या बनवण्याल्या जात आहे. त्यांची स्थापना घरोघरी होणार आहे.

Ganesh Utsav 2023 | पुणे शहरात घरोघरी विराजमान होणार नावीन्यपूर्ण गणपती... नवीन उपक्रम अन् नवे अभियान
Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 19, 2023 | 9:51 AM

पुणे | 16 सप्टेंबर 2023 : गणेश उत्सव सुरु होण्यास आता काही दिवस राहिले आहे. सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु आहे. पुणे शहरात गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. यामुळे देशातील नव्हे तर जगभरातील पर्यटक पुण्यात गणपती पाहण्यासाठी येतात. पुणे शहरात यंदा पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नवीन प्रयोग केला जाणार आहे. प्रथमच विविध पद्धतीच्या गणरायाच्या मूर्त्या बनवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रदूषण होणार नाही. नांदेड सिटी येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठ आणि सामाजिक संस्थांकडून हे अभियान सुरू करण्यात येणार आहे.

कशा पद्धतीने साकारणार मूर्ती

पुणे शहरातील सिंहगड रोडवरच्या नांदेडसिटी येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध पद्धतीने गणरायाच्या सुबक गणेशमूर्ती तयार केल्या जाणार आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तुरटीच्या सुबक गणेशमूर्ती बनवल्या जाणार आहेत. तसेच शाडू माती आणि गुळाच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना घरोघरी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

हे अभियान राबवणार

पुणे शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी धार्मिक आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. नांदेड सिटी येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठ सोबत काही सामाजिक संस्थांपुढे आल्या आहेत. त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती अभियान सुरू केले आहे. त्या अभियान अंतर्गत पर्यावरणपूरक तुरटी, शाडू माती आणि गुळाच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यासाठी या पद्धतीने गणेश मूर्ती बनवल्या जातायत. तसेच आमची मूर्ती, किंमत तुमची’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

नागरिकांचा कल पर्यावरणपूरक उत्सवाकडे

दिवसंदिवस वाढत जाणाऱ्या प्रदूषणामुळे आता पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याकडे कल आहे. पुणे शहरातील नागरिकांच्या यंदा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घेण्याकडे कल वाढला आहे. ठिकाठिकाणी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपतीची मागणी वाढली आहे. तसेच अनेक नागरिकांनी मूर्तीचे बुकींग करुन ठेवले आहे. यामुळे ऐनवेळी वाढणार धावपळ टळणार आहे. तसेच आरास तयार करण्यासाठी पर्यावरणपूर्वक साहित्य वापरले जाणार आहे.

दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं.
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?.
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.