पुणेकरांनो, घराबाहेर पडताना तापमानाचा अंदाज घ्या, तापमानात होणार मोठी वाढ? काय आहे कारण?

Pune Temperature : राज्यासह देशभरात तापमानात आता वाढ होऊ लागली आहे. राज्यात प्रथमच मे महिन्यात तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. इतर शहरांचे तुलनेत थंड वातावरण असलेल्या पुणे शहरात तापमान वाढणार आहे.

पुणेकरांनो, घराबाहेर पडताना तापमानाचा अंदाज घ्या, तापमानात होणार मोठी वाढ? काय आहे कारण?
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 5:03 PM

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात उकाड्यामुळे नागरीक आता हैराण होऊ लागले आहेत. मे महिन्याची सुरुवात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने झाली होती. यामुळे मे महिना असूनही उन्हाळा जाणवत नव्हता. परंतु ८ मेपासून वातावरणात बदल झाला आहे. आता लोकांना उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे शहराचे तापमान वाढणार आहे. यासंदर्भात भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार पुणे शहराचे तापमान ४० अंश सेल्सियसवर जाणार आहे.

का वाढणार तापमान

मे हिटचा तडाखा राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसू लागला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान चांगलेच वाढले आहे. या ठिकाणी 40 अंश सेल्सिअसवर तापमान गेले आहे. राज्यात सर्वाधिक तापमान जळगावात 43.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुणे शहाराचे तापमान 40 अंश सेल्सिअसवर जाणार आहे. बंगालच्या उपसागरात मोचा वादळ आले आहे. यामुळे मागील आठवड्यात झालेला अवकाळी पाऊस थांबणार आहे. तसेच तापमानात वाढ होणार आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरात होणाऱ्या बदलांमुळे पुणे शहराचे तापमान 40 डिग्री सेल्सिअसवर जाणार आहे. यामुळे पुणेकरांना दुपारी घराबाहेर पडण्यापूर्वी तापमानाचा अंदाज घ्यावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

एप्रिल महिन्यात सर्वाधिक पाऊस

एप्रिल महिन्यात यावर्षी राज्यात 46.7 मिलिलिटर पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 1962 मध्ये एप्रिल महिन्यात 23.4 मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर या वर्षीच्या एप्रिलमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद असल्याचे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. म्हणजेच यंदाच्या एप्रिल महिन्यात गेल्या 62 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

एकीकडे एप्रिल महिन्यात 46.7 मिलिलिटर पावसाची नोंद झाली. परंतु एप्रिल महिन्यात ऊनही चांगले तापले होते. अनेक शहरांनी तापमानाची चाळीशी पार केली होती. यामुळे एप्रिल महिना गेल्या 10 वर्षात सर्वाधिक उष्ण आणि सर्वाधिक थंड देखील राहिला आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक 44.4 अंश किमान तापमानाची नोंद झाली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.