पुणे | 3 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना ‘जाको राखे साइयां मार सके ना कोई’ ही म्हण आठवते. वेळ आली होती, पण…असेच काही या व्हिडिओमधून दिसत आहे. दहाव्या मजल्यावर असलेली लिफ्ट अचानक खाली कोसळत असल्याचे त्या व्हिडिओमधून दिसत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील बावधन या भागातील असल्याचे म्हटले जात आहे. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुणे शहरातील बाबधन येथील सोसायटीमधील ४७ सेंकदांचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा दिसत आहे. तो सोबत असणाऱ्या आपल्या मित्राशी गप्पा करत असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. काही सेंकदात लिफ्टचा दरवाजा उघडतो. त्यानंतर दोघे लिफ्टमधून बाहेर पडतात. त्यानंतर लिफ्टचा दरवाजा बंद होतो. त्यानंतर जोराच्या झटक्यांची आवाज येते. तसेच लिफ्ट व्हायब्रेट होतानाही दिसत आहे. लिफ्ट पडत असल्याचे त्यांनी सहज दिसत आहे.
पुणे: 10वीं फ्लोर से गिरी लिफ्ट, गिरने से कुछ सेकेण्ड पहले ही अंदर से निकले थे बच्चे #Pune #lift #PuneLift #viralvideo #ZindaBanda #SPARKTheLife #SafeInternetForKids #Jawan #realmePad2 #SPARKTheLife #Haryana pic.twitter.com/ZPp0TuPMDW
— CRIME CONTROL REFORM ORGANIZATION (CRO) ALL INDIA (@crocrimehq) July 31, 2023
27 जुलैचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. ट्विटरवर ‘क्राइम कंट्रोल रिफॉर्म ऑर्गेनाइजेशन ऑल इंडिया’ (@crocrimehq) हँडलवरुन तो 31 जुलै रोजी पोस्ट केला गेला आहे. या व्हिडिओवर अनेक कॉमेन्ट आल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, जाको राखे साइयां मार सके ना कोई। दुसऱ्याने म्हटले आहे की, शुक्र है… लड़के बच गए। काही जणांना लिफ्टचे मेटनन्स ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी केलीय.
दरम्यान या प्रकरणी हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. लिफ्टची मेटेन्नस एजन्सी, बिल्डर आणि इतरांवर भादवि 336 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात भरत चौधरी याने गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत त्यांचा ११ वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये होता.