AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून अनलॉक, जिल्हाबंदी नाही, ई-पासबाबत निर्णय काय?

पुणेकरांना आता जिल्हाबंदी नसून ते आवश्यक ठिकाणी ई-पासशिवाय प्रवास करु शकतील. (Pune City Unlock Guidelines)

Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून अनलॉक, जिल्हाबंदी नाही, ई-पासबाबत निर्णय काय?
pune
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 9:29 AM

पुणे : पुणे शहरात येत्या सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. शहरातील दैनंदिन स्वरुपाच्या जवळपास सर्व व्यवहारांना मुभा मिळणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरु ठेवता येणार असले, तरी संध्याकाळी पाचनंतर मात्र जमावबंदी आणि संचारबंदीचा आदेश लागू असेल. (Pune City to be Unlock from Monday Third Phase Rules and Guidelines)

पुणेकरांना आता जिल्हाबंदी नसून ते आवश्यक ठिकाणी ई-पासशिवाय प्रवास करु शकतील. पीएमपीएलएम बससेवा 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. तर बँका आणि सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांचे काम आठवडाभर सुरु राहणार आहे. पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठीदेखील हे आदेश लागू असतील. शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू असणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने याच वेळेत सुरू राहणार आहेत.

पुण्यात या गोष्टी सुरु राहणार

1. हॉटेल, रेस्टॉरंट – ( सोमवार ते शुक्रवार ) दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने 2. हॉटेल – शनिवार- रविवार केवळ पार्सल सेवा 3. लोकल – फक्त अत्यावश्‍यक सेवा कर्मचारी 4. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, चालणे – पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत 5. खासगी कार्यालये – ( सोमवार ते शनिवार )  दुपारी 4 पर्यंत ( 50 टक्के कर्मचारी क्षमता) 6. क्रीडा – सकाळी 5 ते 9 , सायंकाळी 6 ते 9 रिकाम्या जागा, मैदानात 7. चित्रीकरण – बायोबबल , सायंकाळी 5 पर्यंत 8. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम -50 जणांच्या उपस्थितीत, सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत 9. लग्न समारंभ – 50 जणांच्या उपस्थितीत 10. अंत्यविधी – 20 जणांच्या उपस्थितीत 11. शासकीय बैठका, सहकार बैठका – सभा – 50 टक्के उपस्थिती 12. बांधकाम – दुपारी 4 पर्यंत मुभा 13. शेती विषयक कामे – आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत (Pune City Unlock Guidelines) 14. संचारबंदी – शहरात सायंकाळी पाचनंतर 15. जिम, सलून, ब्युटी पार्लर – 50 टक्के क्षमतेने , पूर्व नियोजित वेळ घेऊन 16. सार्वजनिक वाहतूक सेवा -50 टक्के क्षमतेने केवळ बसून 17. ई कॉमर्स – नियमित वेळेत 18. मला वाहतूक – नियमित वेळेत

संबंधित बातम्या :

Maharashtra unlock 5 stage : मुंबई नेमकी कोणत्या टप्प्यात?

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम; पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी वेगळा विचार- अजित पवार

(Pune City to be Unlock from Monday Third Phase Rules and Guidelines)

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.