pune fire | पुणे शहरातील दुचाकीच्या शोरुमला भीषण आग, अनेक वाहने जळून खाक

pune fire | पुणे शहरात अधूनमधून आगीच्या घटना घडत असतात. आता पुन्हा एका दुचाकीच्या शोरुमला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे अनेक दुचाकींचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पाच अग्नीशमन दलाचा बंब दाखल झाले.

pune fire | पुणे शहरातील दुचाकीच्या शोरुमला भीषण आग, अनेक वाहने जळून खाक
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 11:39 AM

अभिजित पोते, पुणे | 5 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील आगीचे सत्र सुरुच आहे. एक, दोन महिन्याच्या कालावधीत पुणे शहरात भीषण आगीच्या घटना घडत आहेत. आता गुरुवारी सकाळी सिंहगड रस्त्यावर असणाऱ्या एका दुचाकीच्या शोरुमला आग लागली. या आगीत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ही आग शार्ट सर्कीटमुळे लागल्याची शक्यता आहे.

कुठे लागली आग

पुणे शहरातील सिंहगड रोडवर नवशा मारुती मंदिरामागे दुचाकीचे शोरुम आहे. टिव्हीएस कंपनीचे हे शोरुम आहे. या ठिकाणी सकाळी 7.45 मिनिटांनी आग लागली. आगीची माहिती मिळताच पुणे मनपाच्या अग्निशमन दलाची 5 वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्नीशमन दलाने दीड, दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत सर्व्हिस सेंटरमधील 20 ते 25 दुचाकी जळाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुणे शहरात सातत्याने आगीच्या घटना

पुणे शहरात आगीच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घडत आहे. पुणे शहरातील वाघोलीत येथील गोडाऊनला जून महिन्यात मोठी आग लागली होती. आगीत ४ सिलेंडर फुटले होते. या भीषण आगीत तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर काहीच दिवसांना पुणे शहरातील टिंबर मार्केटमध्येही आग लागली होती. त्या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जुलै महिन्यात कोंढवा बुद्रुकमधील येवलेवाडी येथील गोडाऊनला भीषण आग लागली होती.

हॉटेलच्या आगीत दोघांचा मृत्यू

पुणे येथील मार्केटयार्डमध्ये असलेल्या हॉटेल रेवळ सिद्धी या ठिकाणी जून महिन्यात आग लागली होती. दोन मजले असणाऱ्या या हॉटेलमधील आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी 2022 मध्ये पुणे शहरातील लुल्ला नगरमधील हॉटेलमध्ये आग लागली होती. तसेच जून 2022 मध्ये पुण्यातील रूफ टॉप रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता दुचाकीच्या शोरुमला लागलेली आग शार्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.