पुणे शहरात वाहने वाढली अन् अपघातही, अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूची संख्या मोठी
कोरोनानंतर पुणे शहरातील नागरिकांनी वाहन खरेदी करण्यावर मोठा जोर दिला आहे. यामुळे या आर्थिक वर्षात पुणे शहरामध्ये वाहने वाढलीत आहेत. एकीकडे वाहने वाढत असताना पुणे शहरातील अपघातांची संख्याही वाढत आहेत. नियम पाळले जात नसल्याने अपघात वाढलेय.
योगेश बोरसे, पुणे : पुणे शहरात एकीकडे वाहनांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे असुरक्षित रस्त्यांची परिस्थिती आणि वेगाने होणारी वाहतूक यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. वाहनांची संख्या वाढती असूनही रस्त्याची रुंदी मात्र तशीच आहे. त्यातच वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे अपघात वाढत आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात पुणे शहरामध्ये तब्बल २ लाख ९२ हजार वाहने वाढलीत आहेत. तसेच गेल्या तीन महिन्यात अपघातात शंभर जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात दुचाकीस्वारांची संख्या आधिक आहे.
वाहने वर्षभरात किती वाढली
कोरोनानंतर पुणेकरांनी वाहन खरेदी करण्यावर मोठा जोर दिला आहे. यामुळे या आर्थिक वर्षात पुणे शहरामध्ये तब्बल २ लाख ९२ हजार वाहने वाढलीत आहेत. त्यासोबतच ई-वाहन खरेदीला गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ई-वाहनांची खरेदीसुध्दा तिप्पट झाली आहे. २०२१-२२च्या तुलनेत पुणेकरांकडून २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल २ लाख ९२ हजार २५८ वाहनांची खरेदी करण्यात आली. म्हणजेच २०२१-२२ या वर्षात १ लाख ७० हजार ५३७ वाहनांची खरेदी करण्यात आली होती.
अपघातही वाढले
पुणे शहरात वाहने वाढली आहेत. परंतु रस्ते वाढले नाहीत. वाहतुकीचे नियम पाळले जात नाही. यामुळे शहरात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत झालेल्या ९६ अपघातात शंभर जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. रस्ते अपघातांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत असली, तरी अपघातांचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे.
काय आहेत कारणे
- अपघात झालेल्या दुचाकीस्वारांपैकी अनेकांनी हेल्मेट घातले नसल्याचे समोर आले आहे.
- रॅश ड्रायव्हिंग, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक यामुळे अपघात वाढले
- मानवी चुकांसह अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले
- पुणे शहर व परिसरात मागील तीन महिन्यांत १०० जणांचा अपघाती मृत्यू
- अपघातांमध्ये १६४ जण गंभीर जखमी झाल्याचे वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर
देशभरात अपघात का वाढले
देशभरात 2022 मध्ये 3,68,828 इतकी रस्ते आणि रेल्वे अपघातांची नोंद झाली होती. हे प्रमाण वर्षभरात कैक पटीने वाढले आणि वाहतूक अपघातांचा आकडा थेट 2021 मध्ये 4,22,659 पर्यंत वाढला आहे. या वाहतूक अपघातांमध्ये 4,03,116 रस्ते अपघात, 17,993 रेल्वे अपघात आणि 1,550 रेल्वे क्रॉसिंग अपघातांचा समावेश आहे. त्यात अनुक्रमे 1,55,622 मृत्यू, 16,431 मृत्यू आणि 1,807 मृत्यू अशी मनुष्यहानी झाल्याचे एनसीआरबीने म्हटले आहे.
हे ही वाचा
चालक सिगारेट पीत होता, पुलावर असताना ट्रॅव्हल बसवरचे नियंत्रण सुटले, ३६ प्रवाशांचा जीव धोक्यात