Building Pune | पुणे शहरात उंच इमारतींची भुरळ, प्रथमच वाढले गंगनचुंबी टॉवरचे प्रस्ताव

vertical growth Building Pune | पुणे शहरात उंच इमारतींचे प्रस्ताव वाढत आहेत. यामुळे पुणेकरांची पसंत आता टॉवरकडे जात असल्याचे प्रथमच दिसून आले आहे. पुणे महानगरपालिकेकडे उंच टॉवर उभारण्याचे प्रस्ताव वाढले आहे.

Building Pune | पुणे शहरात उंच इमारतींची भुरळ, प्रथमच वाढले गंगनचुंबी टॉवरचे प्रस्ताव
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 1:03 PM

पुणे | 14 सप्टेंबर 2023 : पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. पुणे शहरात आधी मोठ, मोठे उद्योग उभारले गेले. त्यानंतर आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या येऊ लागल्या. त्यामुळे पुणे शहरात नोकरीसाठी अनेक जण येत आहे. त्याचा परिणाम नवीन फ्लॅट खरेदीवर झाला आहे. पुणे शहरात आणि उपनगरमध्ये अनेक बिल्डरांनी आपले प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पांमध्ये मागणी वाढत आहे. गेल्या सहा महिन्यांत फ्लॅटची विक्री दुप्पट झाली आहे. देशात सर्वाधिक मागणी पुणे शहरात फ्लॅटला येत आहे. पुण्यात फ्लॅटची विक्री वाढत असताना आता उंच टॉवर उभारण्याकडे कल वाढत आहे.

आता 100 मीटरच्या इमारतींना मागणी

पुणे शहरात आता गगनचुंबी इमारती उभारण्याकडे कल सुरु झाली आहे. यापूर्वी राज्यात मुंबईतच गंगनचुंबी इमारती उभारल्या जात होत्या. परंतु आता पुण्यात 100 मीटरच्या इमारती तयार करण्याचे प्रस्ताव वाढत आहे. 2022-23 मध्ये उंच इमारतीचे 17 प्रस्ताव आले आहे. तसेच 10 प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले की, मागील वर्षांपेक्षा या वर्षी उंच इमारत उभारण्याचे प्रस्ताव अधिक आले आहे. यामुळे शहराचा विकास आता व्हर्टीकल होणार आहे. पुणे मनपाकडून या प्रस्तावांना मंजुरी दिली जात आहे.

मनपाकडून बारकाईने तपासणी

पुणे मनपाकडून उंच इमारतींचे प्रस्ताव मंजूर करताना सुरक्षा, स्ट्रक्चरल डिझाइन आणि तंत्रज्ञान या पद्धतीची चिकित्सा करुन मंजूर केले जात आहे. त्यात स्ट्रक्चर डिझाइनचे प्रमाणपत्र, भूगर्भ शास्त्रज्ञांचा अहवाल, मॅकनिकल इलेक्ट्रीकल प्लबिंग रिपोर्ट याची तपासणी केली जाते. तसेच विविध विभागाकडून आलेले ना हरकत प्रमाणपत्रे तपासले जातात. ही सर्व कागदपत्रे उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीसमोर जातात. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यावर उंच इमारतींचे प्रस्ताव मान्य केले जातात.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी 70 मीटरची होती मर्यादा

पुण्यात उंच इमारतीसाठी यापूर्वी 70 मीटरची मर्यादा होती. आता ती 100 मीटरची करण्यात आली आहे. पुणे मनपाकडे आलेल्या 17 प्रस्तावांपैकी सर्वाधिक 9 प्रस्ताव बाणेरमधून आले आहे. चार बिबेवाडी, तीन गुलटेकडी आणि एरंडवणा या भागातील आहेत. यासंदर्भात दहा प्रस्ताव अजून प्रलंबित आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.