पुण्यात रिलसाठी तरुणीचा जीवघेणा स्टंट, व्हिडिओ पाहून बसेल धक्का

Pune stunt viral video: पुण्यातील या तरुणीने रिल बनवण्याच्या नादात गुन्हा केला आहे. मोटार वाहन अधिनियमाचे कलम 184/ S 188 नुसार धोकादायक पद्धतीने वाहन तिने चालवले आहे. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल होऊन पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने शिक्षा किंवा रू. 1,000 दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.

पुण्यात रिलसाठी तरुणीचा जीवघेणा स्टंट, व्हिडिओ पाहून बसेल धक्का
बाईकवर स्टंट करताना तरुणी
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 2:42 PM

पुणे शहराची चर्चा राजकारणापासून शैक्षणिक क्षेत्रापर्यंत होत असते. पुणेरी पाट्यांवर गप्पा होत असतात. परंतु सांस्कृतिक पुण्याची चर्चा आता गुन्हेगारी अन् ड्रग्ससंदर्भात होत आहे. या पुणे शहरातील तरुण पिढी रिल बनवण्यासाठी जीवघेणे स्टंट करत आहेत. पुणे शहरातील तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिलसाठी या तरुणीने जीवघेणा स्टंट केला आहे. दुचाकीवर हात सोडून तिने रिल बनवली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अजून त्या तरुणीचा शोध घेत नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या तरुणीवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत.

काय आहे प्रकार

पुण्यात तरुणीचा जीवघेणा स्टंट व्हायरल झाला आहे. हात सोडून तरुणीने बाईक चालवली आहे. रिल बनवण्याच्या नादात तरुणीकडून अजब प्रकार झाला आहे. पुण्यातील हडपसर भागातील ही घटना आहे. ‘आँखो मे बसे हो तुम, तुम्हे दिल मे छुपा लूँगा…’ या गाण्यावर हावभाव करत ती तरुणी हात सोडून गाडी चालवत आहे. हा रिल तयार करताना गाडीत ठेवलेले गुलाबाचे फूल काढून पुन्हा हावभाव ती करत आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर प्रतिक्रिया…

तरुणीचा स्टंट करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यासंदर्भात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. अनेक युजर्सने या धोकादायक स्टंट प्रकरणात नाराजी व्यक्ती केली आहे. पालकांनी या तरुणांना गाडीच देऊ नये, आपली मुले काय करत आहेत, त्याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा

पुण्यातील या तरुणीने रिल बनवण्याच्या नादात गुन्हा केला आहे. मोटार वाहन अधिनियमाचे कलम 184/ S 188 नुसार धोकादायक पद्धतीने वाहन तिने चालवले आहे. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल होऊन पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिने शिक्षा किंवा रू. 1,000 दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.