Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : पुणे मनपाला खड्ड्यांवरुन न्यायालयाने फटकारले, पण आता आणखी खड्डे होणार

Pune News : पावसाळा आला की रस्त्यांवर खड्डे तयार होता. दरवर्षी नेहमीच येतो पावसाळाप्रमाणे नेहमीच खड्डे तयार होतात. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे शहरातील खड्डयांची गंभीर दाखल घेतली होती. त्यानंतर खड्डेमुक्त पुणे शहर अजून लांबच असणार आहे.

Pune News : पुणे मनपाला खड्ड्यांवरुन न्यायालयाने फटकारले, पण आता आणखी खड्डे होणार
Pune PotholeImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 8:41 AM

पुणे | 3 सप्टेंबर 2023 : पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे हा सर्वात जास्त चर्चेला येणारा विषय असतो. रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात. यानंतर स्थानिक नागरिक आंदोलन करतात. काही दिवस हा विषय चर्चेत असतो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन असो की राज्य सरकार काहीच करत नाही आणि रस्त्यांवरील खड्डे कायम राहतात. यामुळे पुणे शहरात झालेल्या खड्ड्यांची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महानगरपलिका आणि राज्य सरकारला फटकारले होते. परंतु खड्डेमुक्त शहर हे स्वप्न पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागणार आहे.

पुणे शहरात पुन्हा होणार खड्डे

पुणे शहरात समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे पुणे शहरातील तब्बल ५२५ किलोमीटर लांबीचे रस्ते खोदले जाणार आहे. रस्ते खोदले जाणार असल्यामुळे पुणेकरांची खड्ड्यांमधून काही लवकर सुटका होणार नाही. पुणे शहरात समान पाणीपुरवठा योजनेसाठी १ हजार ८०० किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत.

त्या वेळी खोदाई झाली पण रस्ते तसेच होते

कोरोना आणि यानंतरचा काळात पुणे शहरात मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. परंतु यानंतर योग्य पद्धतीने रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे पुणे सारख्या प्रगत शहरात अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करुन खड्डे बुजवावे लागले. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला. परंतु खड्डेमुक्त शहर झाले नाहीच.

हे सुद्धा वाचा

न्यायालयाने घेतली दखल

पुणे शहरातील खड्ड्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात स्वयंप्रेरणे याचिका दाखल झाली होती. ऑगस्ट महिन्यात झालेल्या या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पुणे मनपाला चांगलेच फटकारले. शहरे खड्डेमुक्त ठेवणे आणि त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. तुमची जबाबदारी आम्ही का पार पाडावी? या शब्दांत न्यायालयाने सरकारला फटकारले होते. त्यानंतर या प्रकरणी 29 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेला दिला होते.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....