पुणे येथील युवकाची करामत, नोकरी सोडून सुरु केली शेती, वाचा किती सुरु झाली कमाई
Pune News : शेतीत काही तरी वेगळे प्रयोग केले तर यश मिळते. पुणे जिल्ह्यातील एका युवकाने नोकरी सोडून शेती सुरु केली. त्यानंतर शेतीत चांगले उत्पन्न मिळू लागले. हे उत्पन्न १० लाखांच्या वर गेले. आता इतर शेतकरी त्यापासून प्रेरणा घेत आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यातील सिंगापूर हे गाव. या गावातील युवकाने शेतीमध्ये नवा इतिहास घडवला. कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बंद पडले, नोकऱ्याही गेल्या. त्यानंतर अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केले. परंतु बोटावर मोजता येतील इतक्या तरुणांनी गावी परत येऊन शेती करायला सुरुवात केली. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील सिंगापूर येथे राहणारा तरुण शेतकरी अभिजीत लवांडे. परंतु आता त्याने शेतीत इतिहास घडवला. नोकरीपेक्षा चांगले उत्पन्न ते मिळवत आहेत.
कोणती शेती केली सुरु
अभिजीत पुणे शहराजवळील एका कंपनीत कामाला होता. कोरोना काळात त्याची नोकरी गेली. त्यानंतर त्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. आपले संपूर्ण लक्ष शेतीकडे वळवले. त्याच्याकडे वडिलोपार्जित शेती 9 एकर आहे. पूर्वी अभिजीतचे आई-वडील आणि काका-काकू पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. शेतीमध्ये टोमॅटो, वांगी, पावटा आणि विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली. त्यावर पारंपारीक पद्धतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बारमाही फळबागांची लागवड सुरु केली. त्यासाठी कृषी विभागाकडून शेततळ्यासाठी तीन लाख 30 हजार रुपयांचे अनुदान मिळाले. अभिजीतने काहीतरी वेगळे करायचे ठरवले. शेतीत 4 एकरात अंजीर, 3 एकरमध्ये सीताफळ लावले. तसेच जांभळेही लावले.
600 अंजीराची झाडे
अभिजीतने 4 एकरात पुरंदर जातीची 600 अंजीराची झाडे लावली. अंजीर दोन्ही हंगामात घेतले जाते. मग अंजीर पिकाने अभिजीतचे नशीब उजळले. 100 ते 120 किलो प्रति झाड उत्पादन मिळाले. एकरी 13 ते 14 टन उत्पादन मिळाले. या हंगामात 80 ते 100 रुपये किलो भाव होता. त्याने आंबट आणि गोड अशा दोन्ही प्रकारचे झाडे लावली होती. गोड फळे 85 रुपये किलोपर्यंत विकली गेली. यामाध्यमातून त्याला भरपूर नफाही मिळत आहे. वर्षाला उत्पन्न दहा लाखांवर गेले आहे.
इतर शेतकऱ्यांकडून मागणी अन् रोपांचा व्यवसाय
अभिजीतच्या याच्या यशानंतर इतर नातेवाईक व शेतकरी ही रोपे मागू लागले. त्याने नातेवाइकांसाठी रोपटे तयार केल्यावर आजूबाजूचे शेतकरी रोपांची मागणी करू लागले. मग त्यातून कुटुंबियांना नवीन रोजगार मिळाला.
या व्यक्तीची नऊ देशांत शेती
पुणे शहरात राहिलेल्या एका व्यक्तीने शेतीत ग्लोबल स्वारी केली आहे. पुण्यासह नऊ देशांत ते शेती करत आहेत. विशेष म्हणजे मुळात शेतकरी नसतांना त्यांनी शेती यशस्वी केली आहे. मुळात ‘मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट’ मधील पदवी असणाऱ्या व्यक्तीने लंडनमधील ‘आयटी’ क्षेत्रातील ‘कॉन्ट्रॅक्टिंग’ चा व्यवसाय सोडून शेती सुरु केली. आता तब्बल नऊ देशांत करार शेती करण्याचं दिव्य ते पार पाडत आहेत…वाचा सविस्तर