Pune News | छातीत दुखत होते, मेडिकलवर गोळ्या आणण्यासाठी गेला अन् तेथेच कोसळला
Pune news | पुणे शहरातील एका २३ वर्षीय युवकाबाबत दुर्घटना घडली. त्या युवकाच्या छातीत दुखत होते. त्याने गोळ्या आणण्यासाठी मेडिकलवर धाव घेतली. त्यावेळी विसर्जन मिरवणूकही सुरु झाली होती. मेडिकलवरच त्याला चक्कर आले.
रणजित जाधव, पिंपरी चिंचवड | 28 सप्टेंबर 2023 : सध्या बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर झाला आहे. पुणे शहरातील एका २३ वर्षीय युवकासंदर्भात अचानक दुर्घटना घडली. त्या युवकाचा छातीत दुखत होते. तो गोळ्या आणण्यासाठी मेडिकलवर गेला. त्यावेळी विसर्जन मिरवणूक सुरु होती. डीजेचा आवाज सुरु होता. त्याला त्याच ठिकाणी चक्कर आले. त्यानंतर काही कळण्याचा आतच तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
काय घडला प्रकार
पुणे शहरातील हिंजवडीत राहणारा योगेश अभिमन्यू साखरे हा 23 वर्षीय युवकासंदर्भात दुर्घटना घडली. गुरुवारी गणेश विसर्जन सुरू होती. त्यामुळे डीजे वाजत होता. त्यावेळी छातीत दुखत असल्यामुळे गोळ्या आणण्यासाठी योगेश साखरे मेडिकलमध्ये गेला. त्याला त्या ठिकाणी चक्कर आली. तो जमिनीवर कोसळला. त्यामुळे नेमके काय घडले यावरून काही वेळ गोंधळ उडाला आहे.
का आले चक्कर
घटना घडताच तात्काळ योगेश साखरे याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला पूर्वीचा आजार होते. त्याच्या छातीत दुखत होते. म्हणून तो मेडिकलमध्ये गोळ्या घेण्यासाठी आला. तिथेच त्याला चक्कर आले. यावेळी बाजूलाच गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू होती. डिजेचा मोठा आवाज होता. त्यात योगेशला चक्कर आले. काय झाले काहीच कळाले नाही, यामुळे काहीवेळ गोंधळ निर्माण झाला.
रुग्णालयात दाखल पण…
योगेश साखरे याला रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याला डॉक्टरांनी औंध हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर त्याला औंध हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याची प्राणजोत मालवली.
सध्या सर्वांची जीवन शैली बदलली आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. कमी वयात वेगवेगळे आजार होऊ लागले आहे. त्याचा परिणाम योगेश साखले याच्यावर झाला असण्याची शक्यता आहे. चांगल्या आरोग्यासाठी वेळेवर संतुलित आहार, व्यायम करणे आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे असल्याचे अनेक तज्ज्ञ सांगतात.