Supriya Sule : पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Supriya Sule : "डेटा सांगतोय महाराष्ट्रमध्ये ट्रिपल इंजिन सरकार आल्यापासून महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत. वर्दीची भीती राहिलेली नाही" असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.
“देशभरातून लोकं त्यांच्या मुलं-मुलींना पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात. पुण्याला चांगलं शहर म्हणून ओळख आहे. ही घटना झालीच कशी? याचा फॉलोअप आम्ही करणारं आहोत. सरकार लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देतात, पण आज अनेक महिला म्हणतायत आम्हला 1500 नको. आमच्या मुली सुरक्षित ठेवा. याआधी आंदोलन करून सुद्धा कारवाई झाली नव्हती. म्हणून हे परत आंदोलन करतोय” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरोधात विद्यार्थ्यांनी वाडिया विद्यालयाच्या गेटसमोर आंदोलन केलं. त्यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरोधात पुण्यातील वाडिया विद्यालयाच्या गेटसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. पुण्यात सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून चार जणांनी महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
“पुण्याप्रमाणे मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये अशी घटना झालीय. ज्या हास्पिटलमध्ये राज्यातून मुली येतात डॉक्टर होऊ पाहतात. महिला सुरक्षितता हे प्राधान्य नाही. हे असंवेदनशील सरकार आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “डेटा सांगतोय महाराष्ट्रमध्ये ट्रिपल इंजिन सरकार आल्यापासून महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत. वर्दीची भीती राहिलेली नाही” असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.
‘या राज्याचे गृहमंत्री कायं करतायत?’
“काल बारामती, इंदापूरला घडलेली घटना धक्कादायक आहे. या राज्याचे गृहमंत्री कायं करतायत? त्यांनी उत्तर द्यायला हवं” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. नायर रुग्णालयाच्या केसवर आम्ही स्वतः लक्ष ठेऊन आहोत असं त्यांनी सांगितलं.