पुण्यातील महाविद्यालये सोमवारी नव्हे तर मंगळवारी सुरु होणार, महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदमुळे निर्णय

पुण्यात येत्या सोमवारपासून महाविद्यालये सुरु होणार होती. मात्र, आता प्रशासनाने हा निर्णय एक दिवसाच्या लांबवणीवर टाकला आहे. आता महाविद्यालये सोमवार ऐवजी मंगळवारी सुरु होणार आहेत.

पुण्यातील महाविद्यालये सोमवारी नव्हे तर मंगळवारी सुरु होणार, महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदमुळे निर्णय
PUNE COLLAGE
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 5:07 PM

मुंबई : पुण्यात येत्या सोमवारपासून महाविद्यालये सुरु होणार होती. मात्र, आता प्रशासनाने हा निर्णय एक दिवसाच्या लांबवणीवर टाकला आहे. आता महाविद्यालये सोमवारऐवजी मंगळवारी सुरु होणार आहेत. महविकास आगाडीने सोमवारी पुकारलेल्या बंदमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र बंदमुळे कॉलजे मंगळवारी उघडणार

अजित पवार यांच्या घोषणेनंतर सर्व महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या स्वागतच्या तयारीला लागले होते. मात्र, आता पुण्यातील महाविद्यालये सोमवार ऐवजी मंगळवारी सुरु होणार आहेत. तशी माहिती प्रशानाकडून देण्यात आली आहे. सोमवारी माहविकास आघाडीच्या तिन्ही घटकपक्षांनी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथील शेतकऱ्यांना कारने चिरडल्याच्या घटनेविरोधात बंद पुकारला आहे. सोमवारी संपूर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असतील. याच कारणामुळे महाविद्यालये एका दिवसाने उशिराने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

शिक्षकांनी कोरनाचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक 

पुण्यात कॉलेज सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (8 ऑक्टोबर) दिली होती. त्यानुसार सर्व महाविद्यालये तयारीलादेखील लागले आहेत. यासाठी शिक्षकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पुण्याबाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती.

22 ऑक्टोबरपासून नाट्यगृहे सुरु 

22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह सुरू करणार आहोत. सोमवारपासून राज्य आणि केंद्र सरकारशी संबधित ट्रेंनिग सेंटर सुरू करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. कोरोना लसीकरणात राज्यात पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती 8 ऑक्टोबर रोजी अजित पवार यांनी दिली होती.

पुण्याचा कोरोना संसर्गाचा 2.5 दर आहे

तसेच झोपडपट्टी परिसरात लसीकरण वाढवण्याची सूचना पवारांनी दिली. झोपडपट्टी परिसरात लसीकरण कमी होत आहे. पुण्याचा कोरोना दर 2.5 दर आहे. बाधित दर 3 टक्के आला आहे. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 103 टक्के आहे. पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरण वाढवण्याची गरज आहे. जिल्ह्याने एक कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे, असेदेखील अजित पवार यांनी सांगितले होते.

इतर बातम्या :

Shah Rukh Khan : NCB ने फास आणखी आवळला, आता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला समन्स धाडलं!

पार्थ पवार ड्रग्ज पार्टीत होते का? सोडलेल्या 6 जणांची नावं काय? समीर वानखेडे म्हणाले

VIDEO: मुख्यमंत्री पाहुण्यांसारखे आले आणि गेले, कोकणी माणासाला काहीच दिलं नाही; राणेंचे प्रहार

(pune college will start from tuesday instead of monday due to maha vikas aghadi strike)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.