धक्कादायक ! पुण्यात दुपारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट; आगामी काळात आणखी कडक निर्बंध?

एका दिवसात कोरोना रुग्ण दुप्पट झाल्याने आगामी काही दिवसांत पुण्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (pune corona patient health department)

धक्कादायक ! पुण्यात दुपारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट; आगामी काळात आणखी कडक निर्बंध?
corona virus news
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 4:42 PM

पुणे : राज्यात सर्वत्र कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आसली तरी पुण्यात परिस्थिती जास्त विदारक आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज (23 फेब्रुवारी) दुपारपर्यंत तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढीचे हे प्रमाण दुप्पट आहे. सोमवारी 328 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने आगामी काही दिवसांत पुण्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (pune corona patient becomes doubled in one day health department on alert)

कोरोना रुग्णांत दिवसेंदिवस वाढ

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन सरकारने सावध पवित्रा धारण केला आहे. सरकारकडून वेगवेगळे प्रतिबंध घातले जात आहेत. तसेच, नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहनही स्थानिक प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, एवढे सारे कारुनही काही शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार थांबण्याची चिन्हं दिसत नाहियेत. पुण्यात तर कोरोनाग्रस्तांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे.

एका दिवसात दुप्पट रुग्ण

पुण्यात आज दुपारपर्यंत तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले. यामध्ये संध्याकाळपर्यंत आणखी काही रुग्णांची भर पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी (22 फेब्रुवारी) फक्त 328 कोरोनाग्रस्त आढळले होते. त्यांनतर फक्त एका दिवसात दुप्पट म्हणजेच तब्बल 650 नव्या बाधितांची येथे नोंद केली गेली.

या आकडेवारीवरुन पुण्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. फक्त एका दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्यामुळे आरोग्य प्रशासन धास्तावले आहे. येथे आगामी काळात आणखी कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारकडून काय उपायोजना

दरम्यान, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोनावर जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी ते येथील आरोग्य तसेच जिल्हा प्रशासनाच्या बैठका घेत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पिंपरी चिंचवड शहरात संचारबंदीची घोषणा केली आहे. येथे रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे. रात्री (सोमवार) या संचारबंदीचा पहिलाच दिवस होता. त्यानुसार पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली असून पोलीस अ‌ॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.

तसेच पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी 28 फेब्रवारी पर्यंत शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अभ्यासिका सुरु असल्या तरी सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य करण्यात आलं आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट रात्री 11 पर्यंतच खुले ठेवण्याची परवानगी आहे.

इतर बातम्या :

पिंपरी चिंचवडमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

(pune corona patient becomes doubled in one day health department on alert)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.