Pune Corona Update : मुंबईपाठोपाठ आता पुण्यातील 1ली ते 9वी पर्यंतचा शाळा उद्यापासून बंद, नवी नियमावली काय?

लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करुन शाळा बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेतला जात आहे. काल मुंबईतील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईपाठोपाठ आता पुण्यातील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याची आल्याची माहिती मिळतेय.

Pune Corona Update : मुंबईपाठोपाठ आता पुण्यातील 1ली ते 9वी पर्यंतचा शाळा उद्यापासून बंद, नवी नियमावली काय?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 5:46 PM

पुणे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसंच ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या फैलावामुळेही चिंता वाढली आहे. अशावेळी लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करुन शाळा बंद करण्याचा (Schools Closed) निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेतला जात आहे. काल मुंबईतील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईपाठोपाठ आता पुण्यातील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याची आल्याची माहिती मिळतेय.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आणि अन्य नेते, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोरोना आढावा बैठक होत आहे. या बैठकीत पहिली ते नववी पर्यंतची शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या शाळा किती तारखेपर्यंद बंद राहतील याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

निर्बंध आणखी वाढण्याची शक्यता 

पुण्यात मागील 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या पाच ते सहा दिवसात रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठ दिवसात पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या चौपट झाल्याचं समजतंय. पुण्यात तीन जानेवारी रोजी 444 नव्या रुग्णांची नोंद झालीय. तर 2838 बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. येथे तीन जानेवारी रोजी 120 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे रुग्ण वाढत असल्यामुळे आगामी काळात पुण्यात आणखी कडक नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.

मुंबईतील शाळा बंद

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ हा चिंतेचा विषय ठरु लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतलाय. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.

इतर बातम्या :

रश्मी ठाकरे उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात, शिवसेना नेत्याच्या वक्तव्यानं पुन्हा चर्चेला उधाण

Corona | एक संपला नाही, की आला दुसरा! फ्रान्समध्ये आढळला ओमिक्रॉनपेक्षाही जास्त संसर्गजन्य कोरोना वेरीएंट

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.