पुण्यात कोरोनाच कहर वाढला; कोरोनामुक्त, कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सारखेच, चिंता वाढली

पुण्यात मागील काही दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख वर जात आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 328 नवे रुग्ण आढळून आले आहेत. (Pune corona update pandemic status)

पुण्यात कोरोनाच कहर वाढला; कोरोनामुक्त, कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण सारखेच, चिंता वाढली
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 8:00 PM

पुणे : राज्यात कोरोनाचा (corona) कहर पुन्हा एकदा जाणवू लागला असून पुण्यातही कोरोनाचे रुग्ण (Pune corona update) लक्षणीयरित्या वाढत आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख वर जात आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 328 नवे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे सध्या जेवढे रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत, त्यापेक्षा जास्त रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे येथील प्रशासन धास्तावले असून पुणेकरांची चिंता वाढल्याचे म्हटले जात आहे. (Pune corona update current corona pandemic status)

पुण्यात दिवसभरात किती नवे कोरोना रुग्ण ?

पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे 328 नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात येथे 318 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. येथे उपचारादरम्यान तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असून यापैकी 7 रुग्ण हे पुणे शहराबाहेरील आहेत. पुण्यात सध्या 172 कोरोना रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1 लाख 98 हजार 292 वर पोहोचला आहे. पुण्यात सध्या 2902 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत पुण्यात 4830 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपायोजना

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपायोजना केल्या जात आहेत. कोरोना हॉटस्पॉट म्हणजू जाहीर केलेल्या भागात प्रशासनातर्फे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर, तसेच SARI रुग्णांचे सर्वेक्षण केले जात आहे. खासगी रुग्णालयांमध्ये फ्लू सदृश रुग्णांची RTPCR चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक प्रभावीपणे राबवण्याचे धोरणही येथील प्रशासनाने आखले आहे.

दरम्यान असे असले तरी, पुणे शहर तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. चेहऱ्याला मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिग पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, असे नियम नागरिकांनी पाळावेत असेही येथील प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

इतर बातम्या :

पुन्हा गावाच्या वेशी बंद होणार का?, पुण्यात 12 गावं कोरोनाची हॉटस्पॉट, चिंता वाढली

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.