दुकानं आणि हॉटेल्स सुरु होतात मग मंदिरं का नाही, श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचा सरकारला सवाल
Pune Coronavirus | राज्य सरकारने तातडीने मंदिरे खुली करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. सकाळी 6 ते 11 पर्यंत मंदिरं सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून करण्यात आली आहे.
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवारी सुधारित नियमावली जारी केल्यानंतर पुण्यातील व्यापाऱ्यांपाठोपाठ अध्यात्मिक वर्तुळातही रोष निर्माण झाला आहे. राज्यात दुकाने आणि हॉटेल्स सुरु करण्याासाठी परवानगी मिळत असेल तर मग मंदिरांबाबत (Temples) दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्य सरकारने तातडीने मंदिरे खुली करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा. सकाळी 6 ते 11 पर्यंत मंदिरं सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून करण्यात आली आहे.
पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना आटोक्यात आलेला नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आज नवे कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. या नियमावलीमध्ये पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आलाय. तिसऱ्या लेव्हलमधील नियमांनुसार येथे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील.
लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा: तुषार भोसले
ज्या शहरांत किंवा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दर कमी आहे तिथे राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. त्यानुसार आता हॉटेल, स्पा, जीम, सलून सगळं काही नियम आणि अटींनुसार सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?, असा सवाल करत लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा, अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले (Tushar bhosale) यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. मात्र आता सगळं काही सुरु झालेलं असताना, शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिलेली असताना मंदिरं उघडण्याचा निर्णय देतीख सरकारने घ्यावा, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे.
संबंधित बातम्या:
राज्याची चिंता वाढवणारी बातमी, पुण्यातील ‘या’ गावात डेल्टा प्लसचे 2 रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट
पुण्यात तिसऱ्या लेव्हलचे कोरोना नियम, व्यापारी आक्रमक, “नियम बदला अन्यथा रस्त्यावर उतरणार”
तुळशीबाग मार्केटमध्ये पुणेकरांची तुफान गर्दी, कोरोना नियमांना हरताळ
(Temples in Pune should get open says shrimant dagdusheth ganpati Halwai trust)