अवकाळी पावसाबरोबर पुणे मनपाकडे तक्रारींचा पाऊस, काय आहे प्रकरण

| Updated on: Mar 19, 2023 | 12:01 PM

प्रशासनाने ठरवले तर नागरिकांसाठी अनेक चांगले निर्णय घेता येते. लोकांना तक्रार करण्यासाठी चकरा माराव्या लागत नाही. तंत्रज्ञानाच्या युगात लोकांना घरुनच तक्रार करता येते अन् प्रशासन ती तक्रार सोडवू शकतो. पुणे महानगरपालिकेने हे दाखवून दिले आहे.

अवकाळी पावसाबरोबर पुणे मनपाकडे तक्रारींचा पाऊस, काय आहे प्रकरण
Follow us on

पुणे : पुणे शहरात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाप्रमाणे पुणे महानगरपालिकेकडे (पीएमसी) तक्रारींचा पाऊस पडत आहे. तक्रारींचा हा पाऊस पाणी या विषयाशी संबंधित आहे. पुणे महानगरापालिकेने पंधऱ्या दिवसापूर्वी सुरु केलेल्या या सेवेचा लाभ अनेक जण घेत आहेत. मनपाकडून नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचे त्वरित निवारण केले जात आहे. यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

काय आहे योजना

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांच्या तक्रारींसाठी जाहीर केलेल्या हेल्पलाइन नंबरवर जारी केला आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रारींचा पाऊस पडत आहे. १ मार्चपासून सुरू झालेल्या या हेल्पलाइनवर १७ मार्चपर्यंत ६१० कॉल आले आहेत. यापैकी ४०० हून अधिक कॉलवर आलेल्या तक्रारीचे निवारण केल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. महापालिकेने पाणीपुरवठ्या संदर्भात तक्रार करण्यासाठी ०२०-२५५०१३५८३ ही हेल्पलाइन सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा

हेल्पलाइनवर येणार्‍या अन्य तक्रारींमध्ये पाणी खूप कमी येणे, दोन- दोन दिवस पाणी येत नाही, पाणीपुरवठ्याची वेळ बदला, वेळेवर पाणी येत नाही, मीटर बसविल्यावर पाणी कमी झाले अशा तक्रारींचा अधिक समावेश आहे.

हेल्पलाइन नागरिकांसाठी फायदेशीर


नागरिकांना तक्रार करण्यासाठी आता पुणे मनपा कार्यालयात जावे लागत नाही. तसेच फोनवरुन तक्रार करण्यासाठी वेळेचे बंधन पाळावे लागणार नाही. पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने 24 तास हेल्पलाईन सुरु केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) कार्यक्षेत्रात पाणीपुरवठ्यासंदर्भात काही तक्रार असल्यास करता येणार येते. मग तुमच्याकडे नियमित पाणी येत नाही, कमी दाबाने पाणी येते, परिसरातील पाइप डॅमेज झाला असले किंवा इतर कोणतीही समस्या घरबसल्या सुटू लागल्या आहेत.

कोणत्या क्रमांकावर करावी तक्रार

पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की, मनपाने 24 तास हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. त्यात नागरिक आपल्या तक्रारी करु शकतात .020-25501383 या क्रमांकावर लोकांना तक्रारी करता येईल. दाखल झालेल्या तक्रारीची त्वरित दखल घेऊन कारवाई केली जाईल. यामुळे या नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन अनिरुद्ध पावसकर यांनी केले आहे.