Pune honey Trap | पुणे प्रदीप कुरुलकर प्रकरणात एटीएसला धक्का, कोर्टाने फेटाळला हा अर्ज

Pune honey Trap | पुणे हनी ट्रॅप प्रकरणात दशतवादविरोधी पथकाला धक्का बसला आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकरविरोधात दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु होती.

Pune honey Trap | पुणे प्रदीप कुरुलकर प्रकरणात एटीएसला धक्का, कोर्टाने फेटाळला हा अर्ज
Follow us
| Updated on: Sep 17, 2023 | 8:55 AM

पुणे | 17 सप्टेंबर 2023 : पुणे येथील डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन विकास संस्थेचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी गुप्तचराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होते. पाकिस्तानी महिला गुप्तहेरच्या जाळ्यात ते सापळले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला. या प्रकरणाची एटीएसकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत धक्कादायक माहिती मिळत होती. परंतु प्रदीप कुरुलकर हे तपासाला सहकार्य करत नव्हते. आपले जबाब वारंवार फिरवत होते. म्हणून एटीएसने न्यायालयात अर्ज दाखल केला.

काय केली होती एटीएसने मागणी

प्रदीप कुरुलकर प्रकरणी ATS कडून न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जात प्रदीप कुरुलकर यांची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाईस लेअर चाचणी करण्याची मागणी करण्यात आली. प्रदीप कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप एटीएसकडून न्यायालयात करण्यात आला. त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला. एसटीएसच्या मागणीला प्रदीप कुरुलकर यांच्या वकिलांनी विरोध केला.

काय झाला युक्तीवाद

रासायनिक अहवाल प्राप्त झाल्यामुळे या दोन्ही चाचण्या घेण्याची आवश्यकता नाही. श्रीमती सेल्वी विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटक या सर्वोच्च न्यायालयाचा निकालातील दाखला त्यांनी दिला. यामध्ये फौजदारी खटला संहिता, राज्यघटना यांचा आधार घेत युक्तीवाद केला. पॉलिग्राफ चाचणी आणि व्हॉइस लेअर चाचणीसाठी आरोपीची संमती गरजेचे असल्याचे म्हटले. त्यांचा हा युक्तीवाद न्यायालयाने मान्य करत एटीएसचा अर्ज फेटाळला. आता प्रदीप कुरुलकर यांचा मोबाईलचा डेटा रिकव्हर होता का? त्याकडे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

का केली होती मागणी

प्रदीप कुरुलकर स्वत:च्या पदाचा गैरवापर करुन गोपनीय माहिती व्हॉटसॲप आणि इतर मेसजेच्या साह्याने पाकिस्तानी गुप्तचर झारा दासगुप्ता हिला दिली होती. प्रदीप कुरुलकर तिच्याशी ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलद्वारे बोलत होता. हे प्रकरण उघड झाल्यानंतर एटीएसकडे त्याचा तपास देण्यात आला. एटीएसला कुरुलकर आणि पाकिस्तानी गुप्तहेर झारा यांच्यात झालेले व्हॉट्सॲप चॅट्स मिळाले होते. डीआरडीओ येथील गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना प्रदीप कुरुलकर भेटले होते. त्याची चौकशी एटीएसकडून करण्यात आली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.