पुणे शहरात IPL वर सुरु होता सट्टा, पोलिसांच्या जाळ्यात असे आले आरोपी

पुणे पोलिसांनी आयपीएल सट्टा लावणाऱ्यांवर जोरदार कारवाई केली आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याच्या वेळी काही जणांना अटक केली होती. आता पुन्हा चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यांत सुरु असताना सामन्या दरम्यान अटक केली आहे.

पुणे शहरात IPL वर सुरु होता सट्टा, पोलिसांच्या जाळ्यात असे आले आरोपी
ipl betting
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 1:31 PM

पुणे : सध्या IPL चा थरार सुरु आहे. क्रिकेटप्रेमी IPL चा रोमांच अनुभवत आहे. त्याच वेळी दुसरीकडे IPL वर सट्टा लावणारे बुकी जोरदार कमाई करत आहेत. या बुकींवर कारवाईसाठी पोलिसांच्या टीमचे लक्ष्य केंद्रीत केले आहे. पुणे शहरात आयपीएलवर सट्टा लावणारे पोलिसांच्या जाळ्यात आले आहे. शनिवारी झालेल्या चेन्नई आणि मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

कुठे सुरु होता सट्टा

शनिवारी चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यांत सामना सुरु होता. यावेळी सर्वच जण सामान्याचा रोमांच अनुभवत होते. दुसरीकडे पुणे शहरातील कोंढवा परिसरातील ब्रह्मा अंगण बिल्डिंगमध्ये बुकी आयपीएलवर सट्टा घेत होते. पोलिसांना याची माहिती मिळाली. मग पोलिसांनी सापळा रचत आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या 9 जणांना अटक केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यावेळी पाच लाखाचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी झाली कारवाई

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्यांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने कारवाई केली होती. ही कारवाई येरवड्यातील गुंजन टॉकीजजवळ 6 एप्रिल रोजी केली. आरोपींकडून सात हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपी धरमपाल गोयल याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, पुण्यातील अनेक बडे बुकी पुणे शहर पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.