तीन आत्महत्यांपाठोपाठ पुण्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या, भारती विद्यापीठ परिसर पुन्हा हादरला

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरवाडी भागात मध्यरात्री हत्येची घटना घडली. (Pune Man Murdered Bharti University)

तीन आत्महत्यांपाठोपाठ पुण्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या, भारती विद्यापीठ परिसर पुन्हा हादरला
पुण्यात 35 वर्षीय व्यक्तीची हत्या
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:45 AM

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात एकाच दिवशी तीन आत्महत्या झाल्याचा प्रकार ताजा असतानाच हत्येची घटना समोर आली आहे. डोक्यात विटा घालून 35 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. एकाच आठवड्यात हत्या-आत्महत्यांच्या सत्रामुळे पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime Man allegedly Murdered in Bharti University Area)

डोक्यात विटा घालून दगडाने ठेचलं

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरवाडी भागात मध्यरात्री हत्येची घटना घडली. 35 वर्षीय मोहन चवंडकर यांचा खून करण्यात आला. डोक्यात विटा घालून दगडाने ठेचून चवंडकर यांची हत्या झाली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मोहन चवंडकर यांचा खून कोणी केला हे अद्याप अस्पष्ट आहे. हत्येचं कारणही समोर आलेलं नाही. या प्रकरणी अधिक तपास करत भारती विद्यापीठ पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

35 वर्षीय कार ड्रायव्हरची आत्महत्या

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी 35 वर्षीय निरंजन बाळकृष्ण साळुंखे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तो वंडर सिटीजवळ वर्धापन बिल्डिंगमध्ये राहत होता. निरंजन हा वाहन चालक म्हणून काम करत होता. मात्र गेल्या महिन्यांपासून त्याच्याकडे रोजगार नव्हता. मित्र निरंजनला दररोज जेवणाचा डबा आणून देत असे. सोमवारी दुपारी डबा घेऊन आला असता त्याला निरंजनने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल त्याने उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

40 वर्षीय व्यक्तीनेही आयुष्य संपवलं

दुसरीकडे, चाळीस वर्षीय पोपट पांडुरंग सलगर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तो सुखसागर नगर परिसरातील रहिवासी होती. त्याची मुलं गावाला, तर पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. (Pune Man Murdered Bharti University)

उद्यानासमोर तरुणाचा गळफास

राजीव गांधी उद्यानासमोर एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचेही उघड झाले. त्याच्याजवळ कोणतीही चिठ्ठी, मोबाईल न सापडल्याने या व्यक्तीची ओखळ पटू शकली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. एकाच परिसरात तीन वेगवेगळ्या आत्महत्येच्या घटनांमुळे खळबळ उडाली असून सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात तरुणावर टोळक्याचा कोयता हल्ला, शेजारच्या रहिवाशांनी घरात घेतल्याने तरुण बचावला

शहर पुणे, परिसर भारती विद्यापीठ, एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना

(Pune Crime Man allegedly Murdered in Bharti University Area)

अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.