मोफत सूप देणे हॉटेल चालकाला पडले महागात, पुण्यात झाला सशस्त्र हल्ला

खडकीत रामकृपाल पाल यांनी चौपटीवर हॉटेल सुरु केले. या हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी योजना सुरु केली. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास ते सूप मोफत देऊ लागले.

मोफत सूप देणे हॉटेल चालकाला पडले महागात, पुण्यात झाला सशस्त्र हल्ला
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 2:37 PM

पुणे : पुणे शहरातून (Pune News) धक्कादायक घटना समोर आली आहे. नवीन व्यवसायात जम बसवण्यासाठी सुरु केलेली योजनाच जिवावर बेतली आहे. या योजनेमुळे रागवलेल्या समव्यवसायिकांनी एकावर सशस्त्र हल्ला (Pune Crime News) केला. यात तो व्यक्ती जखमी झाला. या प्रकरणी पोलिसींनी गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहरातील खडकी परिसरात ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पुण्यात कोयता गँगमुळे आधीच दहशत आहे. आता या प्रकारची गुन्हेगारी वाढली असताना अजून भीतीचे वातावरण तयार झाला आहे.

मोफत सूपची योजना

खडकीत रामकृपाल पाल यांनी चौपटीवर हॉटेल सुरु केले. या हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी योजना सुरु केली. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास ते सूप मोफत देऊ लागले. या योजनेमुळे त्यांचा व्यवसाय वाढला. परंतु त्यामुळे प्रतिस्पर्धींचा व्यवसाय मंदावला.

हे सुद्धा वाचा

योजना बंद करण्यासाठी दबाव

सिद्धार्थ भालेराव व दिग्विजय गजारे यांनी रामकृपाल यांना ही योजना बंद करण्याचे सांगितले. कारण या योजनेमुळे त्यांचा व्यवसायावर परिणाम होत आहे. परंतु रामकृपाल यांनी ऐकले नाही. त्यांनी फ्री सूप देण्याची योजना सुरु ठेवली.

यामुळे रामकृपाल यांचांशी सिद्धार्थ भालेराव व दिग्विजय गजारे यांनी वाद घातला. त्यानंतर त्यांच्यांत हाणामारी झाली. रामकृपाल यांच्यांवर चाकूचे वार करण्यात आले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर आरोपी सिद्धार्थ व दिग्विजय फरार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांची वरिष्ठ निरीक्षक विष्णू तम्हाने यांनी तपास सुरु केला आहे.

पुण्यात गुन्हेगारी वाढली

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यात सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँगकडून दहशत माजवली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

दहशत निर्माण करणाऱ्या या सराईत गुन्हेगारांसोबत पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. समीर आणि शाहीदची कोंढव्यात चांगलीच दहशत होती. या भागातील व्यापारीही या गुंडांना घाबरून होते. यामुळे व्यापाऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पोलिसांनी बॉलीवूड स्टाईल वापरली. त्या गुंडांची नुकतीच धिंड काढली. रोज व्यापाऱ्यांना धमकावणाऱ्या या गुंडांची अशी अवस्था पाहून त्यांनी पोलिसांचं अभिनंदन केलं.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....