पुण्यात सायबर चोरट्यांची कमाल, चक्क वाहनांना दिले योग्यतेचे बनावट प्रमाणपत्र
Pune crime news : पुणे शहरात फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. सायबर चोरट्यांकडून अनेकांची फसवणूक केली जातेय. आता या सायबर चोरट्यांनी सरकारी कार्यालयालाही सोडले नाही. त्यांनी वाहनांना बनावट योग्यतेचे प्रमाणपत्र दिले आहे.
अभिजित पोते, पुणे : ऑनलाइन फसवणुकीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. ऑनलाईन फसवणूक करणारे सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवून अनेकांची फसवणूक करतात. यामध्ये अनेकांची आयुष्यभराची पुंजी गेल्याचे प्रकार पुण्यात घडले आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हाधिकारींचा नावाचा अन् फोटोचा वापर सायबर ठगांनी केल्याचा प्रकार उघड झाला होता. दोन वेळा त्यांचे फेसबुकवर बनावट पेज केले होते. आता या सायबर ठगांनी पुणे परिवहन विभागावर हल्ला केला आहे.
काय केले सायबर ठगांनी
सायबर ठगांनी पुण्यातील चक्क आरटीओ कार्यालयावर सायबर हल्ला केला आहे. पुणे आरटीओ कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर सायबर चोरट्यांचा हल्ला केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुणे आरटीओच्या संगणकप्रणालीवर सायबर हल्ला करत त्यांनी ९ वाहनांचे बनावट योग्यता प्रमाणपत्र दिले आहे. वाहन निरीक्षकांचा लॉगिन आयडी अन् पासवर्ड देखील सायबर चोरटयांनी मिळवला अन् बनावट प्रमाणपत्र जारी केले. त्यांच्या या कृतीमुळे परिवहन विभागातील अधिकारी चांगलेच हादरले आहेत.
पोलीस ठाण्यात घेतली धाव
पुणे परिवहन विभागावर सायबर हल्ला झाल्याचा प्रकार समोर येताच अधिकाऱ्यांनी तातडीने पुणे सायबर पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी ज्या संगणकावरुन हा प्रकार झाला त्या आयपी अॅड्रेसवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आता हे सायबर ठग पुणे पोलिसांच्या हातात लागणार का? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
सायबर हल्ला कसा रोखावा
सायबर हल्ला टाळण्यासाठी शासकीय अथवा खाजगी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. सुरक्षित वेबसाईट, सॉफ्टवेअर किंवा अप्लीकेशन त्यांना ओळखता आले पाहिजे. कर्मचारी प्रशिक्षित नसल्यामुळे हल्लेखोर सुरक्षा यंत्रणा भेदून डेटा सायबर हल्ला करतात. आता पुण्यातील प्रकरणात संगणक प्रणालीत काही त्रुट आहे की दुसऱ्या ठिकाणावरुन आलेल्या मेसेजमुळे सायबर चोरटयांना हल्ला करता, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा
पुण्यात आतापर्यंतची सर्वात मोठी ई-फसवणूक, निवृत्त कर्नलला फसवले
cyber fraud : सावध व्हा, सायबर चोरट्यांनी यांना घातला १६ कोटींचा गंडा