पुणे : गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया…, गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या… च्या अखंड जयघोषात ‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. विविधरंगी फुलांनी सजवलेल्या गणेश कुंडात रविवारी अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी 6 वाजून 36 मिनिटांनी श्रींचे विसर्जन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. (Pune : Dagdusheth Ganpati Visarjan at temple)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 129 व्या वर्षी उत्सवात सलग दुसऱ्या वर्षी श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
रविवारी सायंकाळी 5.20 वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. अभिषेकानंतर श्रींची मंगलआरती करण्यात आली. मंदिरामध्येच साकारण्यात आलेल्या गणेश कुंडामध्ये ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्रींचे विसर्जन झाले. हजारो गणेशभक्तांनी हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने अनुभवला. लस घेऊन कोरोनाला हद्दपार करू या… असे सांगणारी आकर्षक रंगावली मंदिराबाहेर काढण्यात आली होती.
During Ganesh Utsav 2021, Ashta Vinayak avatars were celebrated at Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple. Every day in the Utsav, Bappa was offered Uparane of the Ashta (eight) avatars of Lord Ganesha!
Watch the video of Ashtavinayak Ganpati below! pic.twitter.com/M2h7dn4j8G— Dagdusheth Ganpati (@DagdushethG) September 18, 2021
श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली होती. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर 24 तास दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या लिंकवर विसर्जन सोहळा आहे. ज्यांना प्रत्यक्ष त्या त्या वेळी हे कार्यक्रम व सोहळा पाहता आलेला नाही, त्या भाविकांनी ऑनलाईन सुविधांचा लाभ घेत हा सोहळा अनुभवावा, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सव २०२१
यंदा बाप्पांचे विसर्जन पहा लाईव्ह!
दि. १९ सप्टेंबर २०२१, वेळ : सायंकाळी ६.३६ वाजता.
@dagdushethganpati व @dagadushethganapati ह्या आमच्या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजवर!बोला गणपती बाप्पा मोरया!!#india #usa #thailand #uk #europe #mumbai #festival #us #pune pic.twitter.com/rlttEengIL
— Dagdusheth Ganpati (@DagdushethG) September 18, 2021
इतर बातम्या
(Pune : Dagdusheth Ganpati Visarjan at temple)