गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पुण्यातील दगडूशेठ गणपतीला पर्यटनस्थळाचा दर्जा

Pune News : पुणे शहरातील प्रसिद्ध असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाची घोषणा केली. तसेच चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थानच्या विकास कामांसाठी निधी मिळणार आहे.

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, पुण्यातील दगडूशेठ गणपतीला पर्यटनस्थळाचा दर्जा
Dagdusheth Halwai Ganpati
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 3:43 PM

पुणे : राज्यातील नव्हे तर देशातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या (Dagdusheth Halwai Ganpati)भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने या मंदिरासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने दगडूशेठ गणपती मंदिराला आता क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. चिंचवड येथील मोरया गोसावी देवस्थानच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच मोरया गोसावी देवस्थान परिसर विकासासाठी निधी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

अशी झाली मुर्तीची स्थापना

हे सुद्धा वाचा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुण्यातील प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यात प्लेगची साथ आली होती. यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटमुळे ते आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे पूर्णपणे कोलमडले. त्यावेळी त्यांचे गुरू माधवनाथ महाराजांनी दगडूशेठ यांना त्यांना दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करुन त्याची पूजा करण्याचा सल्ला दिला. हेच दोघं भविष्यात अपत्य जसे आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करते, त्याच प्रमाणे हे दैवत तुमचे नाव उज्ज्वल करतील असे सांगितले.

गुरुंचा सल्ला ऐकूण दगडूशेठ यांनी दत्ताची एक एक संगमरवरी मूर्ती तयार केली. तसेच गणपतीची मातीची मुर्ती तयार करुन घेतली. या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते करण्यात आली.

सामाजिक बांधिलकी जपते मंडळ

दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ सामाजिक बांधिकली जपणारे मंडळ आहे. मंदिराला मिळालेल्या पैशातून अनेक सामाजिक कार्य केले जातात. राज्यात किंवा देशात कोणत्याही संकटात हे मंडळ नेहमीच मदतीसाठी पुढे असते. गणपती उत्सव या मंडळाकडून मोठ्या भक्तीभावाने व धुमधडाक्यात साजरा केला जातो. या वेळी मंदिरावर सुंदर विद्युत रोषणाई केली जाते. चांगली आरास तयार केली जाते. लाखो भाविक या मंदिराला दर्शनासाठी येत असतात. भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्यातून दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी विविध दागिने केले आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.