Pune corona update | पुण्यात मृतांचा आकडा 5 हजाराच्या उंबरठ्यावर, रोज हजारो रुग्णांची नोंद, वाचा नेमकी स्थिती काय?
पुण्यात रोज हजारो नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. आज (14 मार्च) पुण्यात तब्बल 1740 बांधितांना कोरोनाची लागण झाली आहे. (pune corona update all information)
पुणे : संपूर्ण राज्यात कोरोनामुळे हाहा:कार उडाला आहे. राज्यातील संपूर्ण जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. पुण्यात (Pune corona) तर ही परिस्थिती जास्तच विदारक आहे. येथे रोज हजारो नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. आज (14 मार्च) पुण्यात तब्बल 1740 बांधितांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दिवसभरात उपचारादरम्यान 17 नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलीये. पुण्यात मृतांची संख्या 4952 वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर असाच राहीला, तर आगामी दोन ते तीन दिवसांत पुण्यात मृतांचा आकडा 5 हजाराचा आकडा पार करु शकतो. रुग्णांमध्ये रोज होणारी ही वाढ आणि मृत्युदार चिंताजनक असल्याचे साथरोग तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. (Pune daily corona update corona cases report all information)
पुण्यात 355 रुग्णांची प्रकृती नाजूक
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. येथे आज दिवसभरात 1740 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर दिवसभरात 858 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. वरील आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण दुप्पट आहे. पुण्यात दिवसभरात उपचारादरम्यान 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यातील दोन रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी पुण्यात 355 कोरोनाबाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. आज एकूण 1740 नवे रुग्ण आढळल्यानंतर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 218202 वर पोहोचली असून आतापर्यंत एकूण 4952 बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 201661 एवढी आहे.
राज्यात दिवसभरात तब्बल 16 हजार कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झालीय. राज्यात दिवसभरात तब्बल 16 हजार 620 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मुंबईतील 1962, पुण्यातील 1740 तर नागपुरातील 2252 नव्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे. कोरोनाचा वाढता आकडा चिंता वाढवणारा आहे. हा आकडा आणखी वाढण्याच्या आधी सर्वसामान्य जनतेने सावध होणं जास्त जरुरीचं आहे. अन्यथा परिस्थिती जास्त भीषण होत जाईल. त्यामुळे लॉकडाऊन सारख्या भयानक गोष्टींना पुन्हा तोंड देण्याची पाळी आपल्यावर ओढवण्याची शक्यता आहे.
पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश
पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेयत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही.
पुण्यात काय सुरु, काय बंद?
?पुण्यात लॉकडाऊन नाही
?पुणे शहरात रात्रीची संचारबंदी
?पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू
?लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी
?31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
?हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
?उद्यान एकवेळ बंद राहणार
इतर बातम्या :
Mamata Banerjee Injured : ममता बॅनर्जींवर हल्ला नाही तर अपघात! हल्ल्याचे पुरावे नाहीत- निवडणूक आयोग
वडिलांना आवाज आवडायचा नाही, रिक्षाही चालवली; आनंद शिंदेंचे किस्से वाचाच!
(Pune daily corona update corona cases report all information)