अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; भाजप नेत्याच्या मागणीने खळबळ

BJP Leader Sudarshan Chaudhari on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत महत्वाचं विधान भाजपच्या नेत्याने केलं आहे. अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, अशी मागणी या नेत्याने केली आहे. कोण आहे हा नेता? का केली अशी मागणी? वाचा सविस्तर.....

अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा; भाजप नेत्याच्या मागणीने खळबळ
अजित पवार. उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 3:53 PM

उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधिमंडळाच्या लिफ्टमध्ये भेट झाली. यावेळी प्रविण दरेकर यांना आधी लिफ्ट बाहेर काढा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. देंवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या भेटीची राजकीय चर्चा होतेय. सोबतच उद्धव ठाकरेंनी केलेलं ‘प्रविण दरेकरांना बाहेर काढा’ हे विधान सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. असं असतानाच या विधानाशी शब्द साधर्म्य असणारं एक विधान भाजप नेत्याने केलं आहे. अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, असं या नेत्याने म्हटलं आहे. या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

“अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा”

अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला. अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, मागणी भाजप नेत्याने केली आहे. भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या समोर भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी ही मागणी केली आहे. शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये सुदर्शन चौधरी यांनी ही खदखद बोलून दाखवली. अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या बोकांडी बसलेत. अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला. अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, असं सुदर्शन चौधरी म्हणालेत.

…अन् अजित पवार सत्तेत सहभागी झाले

मागच्या वर्षी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी भाजपशी हात मिळवणी केली अन् महायुती सरकारमध्ये अजित पवार सामिल झाले. अजित पवारांनी बदलेल्या भूमिकेवर विविध प्रतिक्रिया आल्या. ज्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच अजित पवारांना सरकारमध्ये सामील करून घेतल्याने विरोधी पक्षाकडून भाजपवर टीका केली गेली.

अजित पवार यांनी विरुद्ध विचार धारेच्या लोकांसोबत जात सत्तेत सहभाग घेतल्याचं म्हणत विरोधकांनी अजित पवारांवर निशाणा साधला. आता तर महायुतीतील महत्वाचा पक्ष असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यानेच अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याची मागणी केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Non Stop LIVE Update
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट.
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
राज्यात ‘लाडकी बहीण योजना’ लागू, महिलांनी मुख्यमंत्र्यांना बांधली राखी.
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल
अमिरेकत राज ठाकरे यांचं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत, व्हिडीओ व्हायरल.
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना
सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन, मुख्यमंत्र्यांची नवीन योजना.
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?
काल फडणवीस- ठाकरे तर आज हे दोन नेते आमनेसामने; काय झाली चर्चा?.
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'
'औरंगजेब-याकूब मेमनला फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार?'.
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?
जब चादर लगी फटने तब खैरात लगी बंटने, कुणाकडून सरकारच्या बजेटची चिरफाड?.
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?
'या' शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, काय केली अजितदादांनी घोषणा?.
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा..
तुम्ही 21-60 वर्षाच्या आहात? मग दर महिन्याला 1500 रूपये घेऊन जा...
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?
वर्षाला 3 गॅस सिलिंडर फ्री, दादांकडून नव्या योजनेची घोषणा, कुणाला लाभ?.