पुण्यातील हिट ॲण्ड रन प्रकरणात देवेंद्र फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह; म्हणाले, याचं मला आश्चर्य वाटलं…

Devendra Fadnavis First Reaction on kalyani nagar accident hit and run case : पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघातावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. फडणवीस काय म्हणाले? वाचा सविस्तर...

पुण्यातील हिट ॲण्ड रन प्रकरणात देवेंद्र फडणवीसांकडून प्रश्नचिन्ह; म्हणाले, याचं मला आश्चर्य वाटलं...
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 5:59 PM

पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघातावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी घटनेची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाची ऑर्डर धक्कादायक आहे. आम्ही रिव्हिजन पिटीशन दाखल केली आहे. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. दोन लोकांचा जीव घेतल्यानंतर लिनियंटली सोडून दिलं गेलं हे सहन केलं जाणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

याचं आश्चर्य वाटलं…- फडणवीस

पोलिसांनी कारवाई करत 304 कलम लावलं होतं आणि ज्युवीनाईल कोर्टाकडे प्रकरण पाठवलं. यामध्ये पोलिसांनी स्पष्टपणे लिहिलंय की, दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर अल्पवयीन मुलं गंभीर गुन्ह्यात सहभागी असतील तर कडक कारवाई व्हावी अशी शिफारस केली होती. मात्र ज्युवीनाईल कोर्टाने घेतलेला निर्णय आश्चर्यचकारक आहे. ज्युवीनाईल कोर्टाने घेतलेला निर्णय सरकारच्या आणि लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. सत्र न्यायालयाने पुन्हा ज्युवीनाईल कोर्टाकडे प्रकरण पुनर्वीचार करायला न्यायला सांगितलं आहे. आम्हाला आशा आहे की आज किंवा उद्या ज्युवीनाईल कोर्ट याबाबत निर्णय देईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कल्याणीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

पुणे शहराततील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री अत्यंत भीषण अपघात झाला. भरधाव वेगात पोर्शे कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या पोर्शे कारचा चालक हा अल्पवयीन होता. या कारने दुचाकीला एवढ्या जोरात धक्का दिला की या धडक दुचाकीवरील अनिस दुधिया आणि अश्विनी कोस्टा याचा मृत्यू झाला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पुण्यात गंभीर घटना घडली. त्या घटनेच्या संदर्भात तुम्हाला कल्पना आहे. एका मुलाने गाडी चालवत असताना अपघात केला आणि दोन लोकांचा जीव घेतला. एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर ज्या घटना घडल्या, या संदर्भात लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी आहे. या संदर्भात आज पोलीस विभागाची बैठक घेतली. आतापर्यंत काय घडलं आणि पुढची अॅक्शन काय आहे. आणि अशा घटना घडू नये म्हणून काय करता येईल यावर चर्चा झाली, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.