Sharad Mohol | शरद मोहोळचा गेम कोणी वाजवला, देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट म्हणाले…

Devendra Fadnavis on Sharad Mohol | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येने पुणे हादरलं आहे. शरद मोहोळचा गेम कोणी केला यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Mohol | शरद मोहोळचा गेम कोणी वाजवला, देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट म्हणाले...
Devendra Fadnavis on sharad mohol case
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 3:17 AM

पुणे : पुण्यामध्ये आज भर दिवसा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आलीय. शरद मोहोळवर कोथरूडमधील सुदारदरा परिसरात गोळ्या घातल्या गेल्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळला सह्याद्री रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. पुण्यातील मोहोळ टोळीचा म्होरक्या असलेल्या शरद मोहोळला भरदिवसा संपवल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. शरद मोहोळ याच्या खूनामुळे परत एकदा टोळीयुद्धाला सुरूवात होते की काय अशी भीती सर्वांना वाटू लागली आहे. कारण याआधी मारणे आणि मोहोळ टोळीने रक्ताची खेळलेली होळी सर्वांनी पाहिली आहे. अशातच यावर भरदिवसा झालेल्या शरद मोहोळच्या खूनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीसांनी सांगितलं मोहोळचा गेम कोणी केला?

कोणताही गँग वॉर होणार नाही. कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदाराने केलेली आहे. गुंड कोणताही असो त्याचा बंदोबस्त लावण्याचं काम हे सरकार करतं. त्यामुळं गँग वॉर करण्याची हिंमत कोणताच गुंड करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शरद मोहोळ याच्यावर भर दिवसा दुपारी दीड वाजता गोळ्या घालण्यात आल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार त्याच्या जवळच्या साथीदाराने त्याला संपवलं आहे. नेमका तो कोण आणि कोणाच्या सांगण्यावरून आणि का केलं? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मोहोळ आणि मारणे या दोन टोळींमधील वैर सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे मारणे टोळीकडून कट रचला गेला तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र फडणवीसांनी  सांगितल्याप्रमाणे आरोपी शरद मोहोळचाच जवळचा साथीदार आहे.

दरम्यान, शरद मोहोळ याने मुळशी मधील दासवे गावचे सरपंच शंक धिंडले यांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर मारणे टोळीमधील किशोर मारणेला निलायन टॉकीज जवळ संपवलं होतं. पुण्यातील जर्मन बेकरीमधील आरोपी  कतील सिद्दीकी याची अंडा सेलमध्ये शरद मोहोळ याने विवेक भालेराव याच्या साथीने हत्या केली होती. या घटनेनंतर शरद मोहोळ चांगलाच चर्चेत आला होता.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.