Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashdhi Wari : पुणे जिल्हा प्रशासन वारीच्या स्वागतासाठी सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी अंतिम टप्प्यात

याबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कऱ्हा नदीवरील पुलाची दुरुस्ती, इंदापुर तालुक्यातील आंथुर्णे आणि सणसर येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सपाटीकरण व रस्ता, करण्यात येत आहे. सासवड नगरपालिकेतर्फे पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणाशी संबंधित कामांना वेग आला आहे.

Ashdhi Wari : पुणे जिल्हा प्रशासन वारीच्या स्वागतासाठी सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी अंतिम टप्प्यात
आषाढी वारी ( प्रातिनिधीक फोटो ) Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 7:01 PM

पुणे – कोरोनाच्या महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी यंदा पुन्हा एकदा विठू नामाचा जयघोष घुमताना दिसणार आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनांच्या नेतृत्वाखाली आषाढी वारीची तयारी सुरु झाली आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh)यांच्या मार्गदर्शनाखाली वारीची तयारी सुरु आहे. श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा 2022 ची (Palkhi sohala)तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणे, मूलभूत सोई-सुविधा (Basic amenities)आदीं सर्वगोष्टीची तयारी येत्या 15 जून पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.  श्री क्षेत्र देहू व आळंदी येथून पालखीचे प्रस्थान होत असताना जिल्ह्यातील मुक्कामांच्या ठिकाणाची दुरुस्ती करण्यात करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये काळभोर येथील मोऱ्यांची, बारामतीतील उंडवडी सुपे येथील सर्विस रोडची दुरुस्ती, दौंड ते निरा रस्त्याच्या साईड पट्टयांची दुरुस्ती ही कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फेकेली जात आहे. याबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कऱ्हा नदीवरील पुलाची दुरुस्ती, इंदापुर तालुक्यातील आंथुर्णे आणि सणसर येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सपाटीकरण व रस्ता, करण्यात येत आहे. सासवड नगरपालिकेतर्फे पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणाशी संबंधित कामांना वेग आला आहे.

महिलांसाठी आरोग्याची खास सुविधा

वारीमध्ये मोठ्याप्रमाणात महिलांचा सहभाग असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद आणि दोन्ही महानगरपालिकेतर्फे महिलांना आरोग्याच्या सुविधेसह स्त्रीरोग ततज्ज्ञांचा पुरवठा केला जाणार आहे.महिलांसाठी पालखी मार्गातप्रत्येक ५ किमीला शौचालय सुविधा उभारण्यात येणार आहेत. या सर्व गोष्टींची तयारी यावर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

पाणी पुरवठ्यासाठी विशेष सोय

आषाढी वारीसाठी 37 विहिरी आणि विंधनविहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.70 टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. 112 वैद्यकीय अधिकारी आणि 336  कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. 23 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 87 फिरते वैद्यकीय पथक आणि 108 रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे.

धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं.
दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अ‍ॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली
दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अ‍ॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली.
बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल
बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल.
संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'
संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'.
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?.
भुजबळ संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण..,विरोधकांना फडणवीसांचा चिमटा
भुजबळ संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण..,विरोधकांना फडणवीसांचा चिमटा.
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल
साहब के बारे में क्या बोला तूने, शिवसैनिकाची कामराला धमकी,ऑडिओ व्हायरल.
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी
कोरटकरच्या सुनावणी दरम्यान कोर्टात काय झालं? इनसाईड स्टोरी.
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक
हातात कोल्हापूरी अन् चिल्लर, कोरटकर विरोधात शेकडो शिवप्रेमी आक्रमक.
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू
सेना-भाजप युतीवरून राऊतांनी घेतली फडणवीसा बाजू.