Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

pune weather | मान्सून परतताच पुणे शहरात ऑक्टोबर हिटचे चटके, पारा कितीवर पोहचला

Pune weather Update | राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. पुणे जिल्ह्यातून मान्सून परतला आहे. वातावरणातील या बदलचा चटका पुणेकरांना जाणवू लागला आहे. मान्सून परत जाताच पुण्यातील तापमान वाढले आहे.

pune weather | मान्सून परतताच पुणे शहरात ऑक्टोबर हिटचे चटके, पारा कितीवर पोहचला
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 10:52 AM

पुणे | 7 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहर आणि जिल्ह्यात मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण झाला आहे. राज्यातील ४५ टक्के भागातून मान्सून परतला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यातही पाऊस परतल्यामुळे ऑक्टोबर हिटचा अनुभव आहे. पुणे शहरातही आता ऑक्टोबर हिटचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. तापमान वाढल्यामुळे पुणेकर घामघूम होत आहे. पुणे आणि राज्यात ऑक्टोबर हिट आणखी वाढणार आहे.

पुणे तापमान कितीपर्यंत पोहचले

पुणे शहरातून मान्सून परतला आहे. राज्यातील ४५ टक्के भागातून मान्सून परत गेला असून आता उर्वरित दोन दिवसांत संपूर्ण राज्यातून पाऊस जाणार आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागातून मान्सून परत जाण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुणे शहरातील तापमान ऑक्टोबर हिटमुळे वाढले आहे. आता ३२.४ अंशावर पोहचले आहे. पुण्याप्रमाणे मुंबईतील तापमान वाढले आहे. मुंबईचे तापमान ३२.२ अंशावर पोहचले आहे.

ऑक्टोबर हिट वाढणार

पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १२ ऑक्टोबरपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आता दुपारी ऑक्टोंबर हिटचे चटके जाणवणार असून सध्याकाळनंतर तापमान सामान्य होणार आहे. तसेच पहाटेच्या सत्रात गारवा जाणवेल, असा अंदाज मुंबईच्या हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने वर्तवला आहे.

हे सुद्धा वाचा

या भागातून मान्सून परतला

कोकण, अरबी समुद्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागातून मान्सून परत गेला आहे. यामुळे राज्यात आता थेट पुढच्या वर्षी मान्सूनची भेट होणार आहे. यंदा मान्सूनने सरासरी गाठली नाही. यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प पूर्ण भरले नाही. त्याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली नाही. जून आणि ऑगस्ट महिन्यात यंदा सर्वात कमी पाऊस झाला. जुलै आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.