पुणे शहर दुहेरी हत्याकांडाने हादरले, पती-पत्नीची केली हत्या
आरोपीने दुहेरी हत्याकांड केल्यानंतर रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
रणजित जाधव, पिंपरी चिंचवड, पुणे : कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांच्या (Crime News) धडक कारवाया सुरु आहेत. या गँगचा म्होरक्यासह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. काही जणांवर मकोका लावण्यात आला आहे. काही जणांना हद्दपार करण्यात आले आहे. त्यानंतर पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात दहशत कायम आहे. आता पिंपरी चिंचवड दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. आरोपीने दुहेरी हत्याकांड केल्यानंतर रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शंकर काटे (वय 60)आणि संगीता काटे (वय 55) अशी हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
पिंपरी चिंचवडमधील शंकर काटे आणि संगीता काटे यांची हत्या प्रमोद मगरुडकर (वय- 47) याने केली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हत्या केल्यानंतर तो रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. त्याला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रमोद हा नुकताच दिल्लीवरून आलेला आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.
कशी केली हत्या
दापोडीत हे हत्याकांड घडले.काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते. शंकर आणि संगीता दाप्मत्य बेसावध होते. त्यावेळी प्रमोद आला आणि त्याने टीकावाने त्यांच्यांवर घाव घातला. शनिवार रात्री ही घटना घडली. हत्या केल्यानंतर आरोपी प्रमोद रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरतत होता. स्थानिका नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. भोसरी पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही, असाही सवाल उपस्थित केला जातोय.
नोव्हेंबर महिन्यात दुहेरी हत्याकांड
पुणे शहरात नोव्हेंबर २०२२ मध्ये दुहेरी हत्याकांड झाले होते. पुण्यातील पांडू लमाण वस्तीत अनिल उर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड यांची हत्या झाली होती. चक्क तलवार आणि पालघन सारख्या धारदार हत्यारांनी दोघांवर वार करत त्यांचा खून करण्यात आला होता.