पाकिस्तानी हसीनाशी प्रदीप कुरुलकर ‘या’ ॲपच्या माध्यमातून साधत होता संपर्क

Pune News Honey Trap : पुणे शहरात उघड झालेले हनी ट्रॅप प्रकरणात आणखी एक माहिती मिळाली आहे. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झालेला आरोपी प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी हसीनाशी कसा संपर्क करत होतो, ती माहिती समोर आलीय.

पाकिस्तानी हसीनाशी प्रदीप कुरुलकर 'या' ॲपच्या माध्यमातून साधत होता संपर्क
pradeep kurulkar
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 11:26 AM

योगेश बोरसे, पुणे : येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर याच्यासंदर्भात अजून एक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी हसीनाच्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्या प्रदीप कुरुलकर याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोन हजार पानांच्या या दोषरोपपत्रात तो पाकिस्तानी हसीनाशी कसा संपर्क साधत होता, देशातील कोणती गोपनीय माहिती त्याने दिली, हा सर्व उल्लेख आहे. दहशतवाद विरोधी पथकाने प्रदीप कुलरुकर केसचा संपूर्ण तपास करुन हे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

कोणत्या माध्यमातून दिली माहिती

पाकिस्तानी हसीनाशी संपर्क साधण्यासाठी प्रदीप कुरुलकर वेगवेगळे सोशल मीडिया ॲप्लिकेशनचा तो वापर करत होता. डीआरडीओचा तेव्हा संचालक असलेला प्रदीप कुरुलकर आणि पाकिस्तानी हसीना झारा दासगुप्ता यांचा संपर्क व्हॉट्सॲपने होत होता. तसेच सोशल मीडियावरील वेगवेगळे ॲप्सचा वापर ते करत होते. बिग चँट, क्लाऊड चँटवरून दोघे संवाद करत असल्याची माहिती पुणे न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून उघड झाली आहे. पहिल्या चँटमध्ये झाराला सरफेस टू एअर मिसाईलबदल माहिती दिल्याचं झालं उघड झाले आहे.

काय काय माहिती दिली

कुरुलकर याने अनेक महत्वाची माहिती झारा दासगुप्ता हिच्यासोबत शेअर केली. त्यात संरक्षण प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची रचना, गुजरातमधील संरक्षण कार्यक्रमात दाखवण्यात आलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, आकाश लाँचरची माहिती होती. तसेच नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये काय आहे ही माहितीसुद्धा त्याने दिली.

हे सुद्धा वाचा

खासगी कंपनीची दिली माहिती

भारतीय संरक्षण दलासाठी उपकरण बनवणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सीईओची माहिती प्रदीप कुरुलकर याने त्या हसीनाला दिली. तसेच डीआरडीओशी संबंधित अनेक लोकांची माहिती अन् डीआरडीओचो ड्युटी चार्टही त्याने तिला शेअर केले.

क्षेपणास्त्रांची माहिती दिली

पाकिस्तानी हसीनाचा पूर्ण जाळ्यात प्रदीप कुरुलकर अडकला होता. यामुळे भारताच्या क्षेपणास्त्रांची माहिती त्याने तिला दिली. देशाचे सर्वात महत्वाची क्षेपणास्त्र असलेल्या ब्रह्मोस, अग्नी या क्षेपणास्त्राची गुपिते त्याने दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे देशाचे अनेक गुपिते पाकिस्तानपर्यंत पोहचली.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.