Pune News : ईडीची मोठी कारवाई, या कंपनीच्या नऊ मालमत्ता जप्त

Pune ED seizes 9 properties : पुणे शहरातील एक कंपनीवर अंमलबजावणी संचालयाने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात विविध ठिकाणी असलेल्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. गेल्या काही दिवसांत पुणे शहरात झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.

Pune News : ईडीची मोठी कारवाई, या कंपनीच्या नऊ मालमत्ता जप्त
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 04, 2023 | 4:00 PM

पुणे | 4 सप्टेंबर 2023 : पुणे शहराकडे अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) लक्ष गेल्या काही दिवसांपासून आहे. पुणे शहरात ईडीने यापूर्वी अनेक वेळा छापे टाकले होते. आता पुणे शहराशी संबंधित कंपनीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. या कंपनीच्या नऊ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कंपनीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील मालमत्ता सील केल्या आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकार

पुणे येथील कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. यासंदर्भात ईडीने पत्रक काढून माहिती दिली आहे. पुणे येथील वेंकटेश्वरा हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड (M/s VHPL) ही कंपनी आणि त्याची उपकंपनी व्हिओएलच्या एकूण नऊ मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. सुमारे 65 कोटी 53 लाख रुपयांच्या या मालमत्ता आहेत.

का जप्त केल्या मालमत्ता

अंमलबजावणी संचालनालयाने 2011 पासून वेंकटेश्वरा हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आणि युनायटेड किंगडम या त्याच्या उपकंपनीची चौकशी सुरु केली होती. या प्रकरणाच्या तपासातून मेसर्स व्हीएचपीएलने मेसर्स व्हीओएलचा व्यवसायात गैरप्रकार आढळून आला. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा

असा पाठवला निधी

व्हीओएल कंपनीला इक्विटी इन्फ्युजनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी मुळ कंपनीतून पाठवला गेला. परंतु कंपनीतून कोणत्याही प्रकारचे प्रॉडक्शन सुरु झाले नाही. यामुळे एकूण 65 कोटी 53 रुपयांचा व्यवहार यामध्ये झाला होता. व्हीएचपीएल या कंपनीने पाठवलेल्या निधीतून युनायटेड किंगडमने “अलेक्झांडर हाऊस” नावाची स्थावर मालमत्ता खरेदी केली. व्हिएचपीएल कंपनीने पाठवलेला पैसा व्हिओएल कंपनीने युकेमधील मिळालेले कर्ज फेडण्यासाठी केला.

यापूर्वी ही मोठी झाली होती कारवाई

पुणे परिसरात असलेल्या पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेसंदर्भात ईडीने मोठी कारवाई केली होती. या बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी केली होती. मूलचंदानी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केले होते. सुमारे 450 कोटींचा हा घोटाळा होता. या प्रकरणी मूलचंदानी आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई झाली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.