पुणे शहरातील जुना बाजारातील दुकानांना आग, शेजारीच होती झोपडपट्टी
मंगळवार पेठेतील या भागांमध्ये वायरिंग, इलेक्ट्रिक, लाकडी फर्निचर अशी दुकानं आहेत.बुधवारी सकाळी अचानक या दुकानांना आग लागली. आगीची माहिती त्वरित अग्निशमन दला स्थानिक नागिराकांनी दिली.
पुणे : पुणे शहरातील (pune) जुना बाजार परिसरात असलेल्या दुकानांना मोठी आग लागली आहे. या परिसरात अनेक वस्तूंची दुकाने आहेत. मंगळवार पेठेतील या भागांमध्ये वायरिंग, इलेक्ट्रिक, लाकडी फर्निचर अशी दुकानं आहेत.बुधवारी सकाळी अचानक या दुकानांना आग लागली. आगीची माहिती त्वरित अग्निशमन दला स्थानिक नागिराकांनी दिली. त्यानंतर घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या ८ गाड्या दाखल झाल्याआहेत. आगीचे भीषण रूप दिसू लागले होते. या घटनेमुळे स्थानिक लोकांची चांगलीच तारांबळ उडालीअग्निशामन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग शार्टसर्कीटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणीतीही जीवीतहानी नाही.
पुण्यातील जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना मोठी आग लागली आहे. pic.twitter.com/A8BWEEuq8g
हे सुद्धा वाचा— Dhanshri Otari (@DhanshriOtari) January 18, 2023
पुणे शहरातील मंगळवार पेठेत जुनाबाजर परिसर आहे. या भागांत असलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकानांना भीषण सकाळी ७.३० वाजता आग लागली. ही आग झोपडपट्टीपर्यंत पोचली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र दहा ते बारा दुकानं आणि झोपडपट्टीतील काही घरे जळून आगीत खाक झाली आहे.
दाट वस्तीचा भाग :
मंगळवारी पेठ हा दाट वस्तीचा भाग आहे. यामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यसाठी चांगलीच कसरत करावी लागली. जवानांनी आपले कौशल्य दाखवतका तासातच आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.