उरवडे आग प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी

मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

उरवडे आग प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी
dilip walse patil
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 3:54 PM

पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आग कशामुळे लागली, याला जबाबदार कोण यासाठीच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होईल. चौकशीचा प्राथमिक अहवाल प्राप्त होताच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल. त्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. यावेळी ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला. (Pune fire not because of short circuit: dilip walse patil)

मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीची पाहणी करण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी दुर्घटनास्थळी आले होते. आगीत भस्मसात झालेल्या कंपनीची पाहणी केल्यानंतर वळसे-पाटील यांनी मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, रुपाली चाकणकर, संतोष मोहोळ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक लोकप्रतिनिधी, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वळसे-पाटील यांनी अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेतली.

मृतदेहांची ओळख पटविण्यात तीन दिवस लागणार

या उद्योगात अनेक गोष्टी ज्वलनशील असल्याने आग सगळीकडे पसरली. आगीचे कारण, त्याला जबाबदार कोण? हे निश्चित केलं जाईल. तसेच अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल. प्राथमिक अहवाल आजच प्राप्त होईल. डीएनए टेस्ट करूनच मृतदेह ओळखता येतील त्याशिवाय ओळखता येणार नाहीत. यासाठी ससूनमध्ये दोन ते तीन दिवस लागू शकतात, असं ते म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आग नेमकी कशी लागली?

संबंधित घटना ही उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजिस या कंपनीत घडली. सोमवारी (7 जून) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास या कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. संबंधित कंपनी ही क्लोरिफाईडची असल्याने आग अधिकच भडकली. आगीमागील नेमकं खरं कारण काय? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. वॉटर प्युरीफायरसाठी लागणारं क्लोराईड नावाचं केमिकल बनवणारी ही कंपनी होती. आगीनंतरही कंपनीत क्लोरीन, क्लोराईडचे बॉक्स दिसत आहेत. केमिकल कंपनी असल्यामुळे आग जास्त धुमसली. जिल्हाधिकाऱ्यांनी आगीत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, कंपनीच्या मालकांनी आगीत 17 जण गमवल्याची तक्रार केली होती. 18 जणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले आहेत. (Pune fire not because of short circuit: dilip walse patil)

संबंधित बातम्या:

Pune Fire | पुण्यात केमिकल कंपनीला भीषण आग, 15 ते 20 जण अडकल्याची भीती

Pune Fire : सॅनिटायझर कंपनीत 15 महिलांसह 17 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?

रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची घोषणा

(Pune fire not because of short circuit: dilip walse patil)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....