Pune Ganpati Visarjan | पुणेकरांनो, आज घराबाहेर पडताय, पाहा पुणे शहरातील कोण-कोणते रस्ते राहणार बंद

Pune Ganpati Visarjan 2023 | गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सवाचा समारोप गुरुवारी होत आहे. त्यानिमित्ताने काढण्यात येणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे शहरात वाहतुकीत मोठे बदल केले आहे. अनेक रस्ते बंद असणार आहे.

Pune Ganpati Visarjan | पुणेकरांनो, आज घराबाहेर पडताय, पाहा पुणे शहरातील कोण-कोणते रस्ते राहणार बंद
गणेश विसर्जनImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 9:12 AM

पुणे | 28 सप्टेंबर 2023 : गेल्या दहा दिवसांपासून घराघरात गणरायाची भक्तीभावाने पूजा होत होती. गुरुवारी अनंत चतुदर्शीला गणरायाचे विसर्जन होणार आहे. पुणे शहरात विसर्जनाची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. गणेश मंडळांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. पुणे शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक २८ सप्टेंबर रोजी सकाळी वाजता सुरू होणार आहे. या मिरवणुकीसाठी पोलिसांनी तयारी केली आहे. ठिकठिकाणी बंदोबस्त राहणार असून विसर्जन मार्गावरील रस्ते बंद केले आहे.

किती रस्ते असणार बंद

पुणे शहरातील १७ रस्ते सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी टप्प्या-टप्प्याने बंद करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीमुळे हा निर्णय घेतला आहे. तसेच काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे. बंद रस्त्यांमध्ये खालील रस्त्यांचा समावेश आहे.

  1. शिवाजी रस्ता म्हणजेच काकासाहेब गाडगीळ चौक ते जेधे चौक हा रस्ता सकाळी सातपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे.
  2. लक्ष्मी रस्ता म्हणजेच संत कबीर चौकी ते टिळक चौक हा रस्ता सकाळी सातपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे.
  3. सकाळी १० पासून केळकर रस्ता म्हणजेच बुधवार चौक ते टिळक चौक बंद राहणार आहे.
  4. सकाळी नऊपासून टिळक रस्ता म्हणजे जेधे चौक ते टिळक चौक बंद राहणार आहे.
  5. सकाळी नऊपासून गुरू नानक रस्ता म्हणजेच देवजीबाबा चौक ते गोविंद हलवाई चौक बंद राहणार आहे.
  6. बाजीराव रस्ता म्हणजेच बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक हा रस्ता दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे.
  7. कुमठेकर रस्ता म्हणजेच टिळक चौक ते चितळे कॉर्नर हा रस्ता दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे.
  8. शास्त्री रस्ता म्हणजेच सेनादत्त चौकी ते टिळक चौक हा रस्ता दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे.
  9. गणेश रस्ता म्हणजेच दारूवाला पूल ते जिजामाता चौक हा रस्ता दुपारी १२ पासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे.
  10. जंगली महाराज रस्ता म्हणजेच झाशी राणी चौक ते खंडुजी बाबा चौक हा रस्ता सायंकाळी चारपासून बंद राहणार आहे.
  11. कर्वे रस्ता म्हणजेच नळस्टॉप चौक ते खंडुजी बाबा चौक हा रस्ता सायंकाळी चारपासून बंद राहणार आहे.
  12. फर्ग्युसन रस्ता म्हणजेच खंडुजीबाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज गेट हा रस्ता सायंकाळी चारपासून बंद राहणार आहे.
  13. भांडारकर रस्ता म्हणजेच पीवायसी जिमखाना ते गुडलक चौक हा रस्ता सायंकाळी चारपासून बंद राहणार आहे.
  14. पुणे-सातारा रस्ता म्हणजेच व्होल्गा चौक ते जेधे चौक हा रस्ता सायंकाळी चारपासून बंद राहणार आहे.
  15. सोलापूर रस्ता म्हणजेच सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक हा रस्ता सायंकाळी चारपासून बंद राहणार आहे.
  16. प्रभात रस्ता म्हणजेच डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक हा रस्ता सायंकाळी चारपासून बंद राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

शहरात १८ विसर्जन घाट

गणरायाच्या विसर्जनासाठी १८ घटांवर व्यवस्था करण्यात आली आहे. नदीपातळीवर होणारी दुर्घटना टाळण्यासाठी १२८ जीवरक्षकांची नियुक्ती घाटावर करण्यात आली आहे. निर्माल्य संकलनाची व्यवस्था अनेक ठिकाणी केली आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.