पुण्यातील या गणपती मंडळाच्या देखाव्यावरुन वाद, कठोर कारवाईची तयारी, थेट…

Pune Ganesh Festival Golden Temple: अमृतसरचे सुवर्ण मंदिर हे शिखांचे पवित्र स्थळ आहे. त्यामुळे गणेश मंडळ त्याचा देखावा सादर करु शकत नाही. या प्रकारामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जातील. ही गोष्ट शीख परंपरा आणि मुल्यांच्या विरोधात आहे.

पुण्यातील या गणपती मंडळाच्या देखाव्यावरुन वाद, कठोर कारवाईची तयारी, थेट...
pune ganesh utsav
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 11:44 AM

Pune Ganesh Festival Golden Temple: पुणे शहरातील गणेशोत्सव राज्यभर नाही देशभरात लोकप्रिय आहेत. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातील लोक येतात. दहा दिवस भाविकांच्या गर्दीने पुण्यातील रस्ते भरुन गेले असतात. यंदा पुण्यातील एका गणेश मंडळाने साकारलेल्या गणेशोत्सवातील देखाव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. अमृतसर येथील ‘गोल्डन टेम्पल’चा देखावा या मंडळाकडून उभारण्याचे काम सुरु आहे. त्याला शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून (SGPC) विरोध दर्शवला आहे. श्री हरमंदिर साहिबची कॉपी करता येणार नसल्याचे प्रबंधक समितीने म्हटले आहे. त्यासाठी आज शुक्रवारी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे प्रतिनिधी मंडळ येत आहे. समितीकडून मंडळावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, असे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे.

का घेतला आक्षेप

पंजाबमधील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने अमृतसर सुवर्ण मंदिराच्या देखाव्याला आक्षेप घेतला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाने उभारण्याचे काम सुरु केले आहे. त्यालाच गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून आक्षेप घेण्यात आला आहे. कमिटीचे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी म्हटले की, अमृतसरचे सुवर्ण मंदिर हे शिखांचे पवित्र स्थळ आहे. त्यामुळे गणेश मंडळ त्याचा देखावा सादर करु शकत नाही. या प्रकारामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जातील. ही गोष्ट शीख परंपरा आणि मुल्यांच्या विरोधात आहे. गुरुद्वाराच्या प्रतिकृतीच्या चौकशीसाठी अमृतसर येथून एक टीम पुण्याला पाठवली आहे, असे शिखांच्या सर्वोच्च धार्मिक कमिटीने म्हटले आहे.

परवानगी दिली नाही…

दरम्यान, गुरुवारी मंडळात सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्याचे काम जोरात सुरू होते. कारागिरांनी भव्य वास्तूंवर सोनेरी रंग लावणे सुरु केले होते. कॅम्प येथील गुरुद्वारातील विश्वस्तांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, मंडळाच्या बांधकामात त्यांची कोणतीही भूमिका नाही. सुवर्ण मंदिराची प्रतिकृती योग्य प्रकारे केले जात आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांना मंडळाने आमंत्रित केले होते. त्यावेळी आम्हाला ते अचूक दिसले. आम्हाला तर उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु अमृतसरहून फोन आला की, सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्यासाठी मंडळाला परवानगी दिली नाही.

हे सुद्धा वाचा

मंडळाने मांडली आपली भूमिका

छत्रपती राजा राम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर म्हणाले, सुवर्ण मंदिर आमच्यासाठी आदराचे आणि श्रद्धेचे ठिकाण आहे. आम्ही नांदेडच्या गुरुद्वाराला 12 जुलै रोजी यासंदर्भात पत्र देखील पाठवले. या पत्रांमध्ये आमच्या गणेश मंडळासाठी सुवर्ण मंदिराची प्रतिकृती तयार करण्यासाठी आशीर्वाद मागितले होते. आम्ही पुण्यातील सर्व 40 गुरुद्वारांकडे पाठपुरावा करुन आमची कल्पना सांगितली. त्यानुसार आम्ही आमचे नियोजन केले. गणेश मंडळ प्रतिकृती उभारण्यासाठी दोन-तीन महिने लागतात. आम्ही काहीही चुकीचे होऊ देणार नाही.

जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.