Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवार, निलेश लंकेनंतर आता चंद्रकांत पाटील वादात, गुंड गजानन मारणे याने केला सत्कार

pune gangster Gajanan Marne: कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. त्याने पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे.

पार्थ पवार, निलेश लंकेनंतर आता चंद्रकांत पाटील वादात,  गुंड गजानन मारणे याने केला सत्कार
चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करताना गजा मारणे
Follow us
| Updated on: Aug 29, 2024 | 11:13 AM

gangster Gajanan Marne: अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणे कनेक्शन समोर आला आहे. राष्ट्रवादी आणि गजानन मारणे प्रकरण शांत होत नाही तोच भाजप नेते अन् मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार गजानन मारणे याने केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप टीका होऊ लागली आहे. यापूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा सत्कार गजानन मारणे याने केला होतो. त्यानंतर शरद पवार गटातील खासदार निलेश लंके याचाही सत्कार गजा मारणे याने केला होतो. त्यावेळी भाजपने निलेश लंके यांच्यावर टीका केली होती.

दहीहंडी कार्यक्रमात सत्कार

कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार केला. त्याने पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले. गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे. चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्याची तयारी चंद्रकांत पाटील यांनी सुरू केली आहे. यापूर्वी या गुंडासोबत भाजपचेही कनेक्शन समोर आल्याने विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे. या प्रकारानंतर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्ला केला आहे. त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि गुंड गजानन मारणे यांच्या व्हिडिओ एक्सवर शेअर केला. त्यात ‘लाडके गुंड’ असे कॅप्शन दिले आहे. मंत्री महोदयांनी पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले, असा चिमटा काँग्रेसने काढला आहे.

यापूर्वी झाला होता वाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काही महिन्यांपूर्वी कोथरूडमध्ये गजा मारणे याची भेट घेतली होती. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आले होते. त्यावरुन टीका झाल्यानंतर अजित पवार यांनीही पार्थ यांचे कान टोचले होते. त्यानंतर अहमदनगर लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याची भेट घेतली. त्याच्याकडून निलेश लंके यांनी सत्कार स्वीकारला होता. त्यावेळी निलेश लंके यांनी गजा मारणे कोण आहे? हे आपणास माहीत नव्हते, असे स्पष्टीकरण दिले होते.

हे सुद्धा वाचा

कोण आहे गजा मारणे

गजानन मारणे हा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात रहिवाशी आहे. मारणे टोळीचा तो म्होरक्या आहे. त्याच्यावर पुणे पोलीस आणि इतर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणामध्ये अटक झाली होती. या प्रकरणात त्याला शिक्षा झाल्यामुळे तो येरवडा कारगृहात होता. मारणे आणि मोहोळ टोळीचा पुण्यात दबदबा आहे.

कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....
भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा
भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा.
'अंदर की बात है...', विरोधकांच्या घोषणाबाजीवर फडणवीसांचा मिश्कील टोला
'अंदर की बात है...', विरोधकांच्या घोषणाबाजीवर फडणवीसांचा मिश्कील टोला.